शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
2
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
3
Share Market Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात जोरदार खरेदी; Sensex-Nifty मध्ये तुफान तेजी
4
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
5
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
6
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
7
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
8
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
10
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
11
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
12
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
13
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
15
ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...
16
भाजपची 'चाणक्य नीती'? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!
17
ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी! पक्ष संघटनेच्या विरोधात काम करीत असल्याने कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
19
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
20
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट

सैलानी यात्रेत गुरुवारी पेटणार नारळांची होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:21 AM

पिंपळगाव सैलानी : सर्वधर्माचे प्रतीक असलेल्या हाजी अब्दुल रहेमान  ऊर्फ सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये गुरूवार, १ मार्च रोजी शे.रफिक  मुजावर, हाजी शेख हाशम मुजावर, शे.नजीर मुजावर यांच्याहस्ते  होळीची पूजाविधी करून लाखो नारळांची होळी पेटविल्या जाणार आहे. 

ठळक मुद्देलाखो भाविकांची उपस्थिती विविध राज्यातील भाविकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी : सर्वधर्माचे प्रतीक असलेल्या हाजी अब्दुल रहेमान  ऊर्फ सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये गुरूवार, १ मार्च रोजी शे.रफिक  मुजावर, हाजी शेख हाशम मुजावर, शे.नजीर मुजावर यांच्याहस्ते  होळीची पूजाविधी करून लाखो नारळांची होळी पेटविल्या जाणार आहे. या होळीला प्रदक्षिणा घालण्यासाठी व दर्शनासाठी लाखो भाविक दाखल  झाले असून, होळी बंदोबस्तासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. होळीसाठी  व्यापार्‍यांनी नारळांचे मोठमोठे ढिगार लावले आहे तसेच भाविकांना  राहण्यासाठी राहुट्या उभ्या केल्या आहे तसेच भाविकांच्या वाहनांसाठी  िपंपळगाव सराई सैलानी रस्त्यावर मारोती मंदिराजवळील शेतामध्ये  पोलीस प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच  ट्रॅफिक सुरळीत राहण्यासाठी ठाणेदार जे.एन.सय्यद प्रत्येक रस्त्यावर  ट्रॅफिक पोलीस कार्यरत राहणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक  शशिकुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त  ठेवणार आहे.

आरोग्य सुविधेसाठी ३0 डॉक्टरांसह ६0 कर्मचारीसैलानी बाबांच्या यात्रेला येणार्‍या भाविकांसाठी बुलडाणा आरोग्य  विभागाच्यावतीने ३0 डॉक्टरांसह ६0 कर्मचार्‍यांची टिम सैलानी  यात्रेसाठी पाठविली असून, या आरोग्य सेवेची पाहणी करण्यासाठी  बुलडाणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, अतिरिक्त  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोफणे यांनी सैलानी यात्रेतील आरोग्य  कॅम्पला भेट देऊन आरोग्य सेवेविषयी अडचणी जाणून घेतल्या. सैलानी  यात्रेतील भाविकांना आरोग्य विभागाच्यावतीने २४ तास आरोग्य सेवा  देणार असून, अतिआवश्यक सेवेसाठी ऑक्सिजनसह अँम्ब्युलन्सची  व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सैलानी यात्रेत ढासाळवाडी रस् त्यावर सैलानी-पिंपळगाव रस्त्यावर फिरती अँम्ब्युलन्स सेवा रूग्णांना  पुरविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.अरूण  जवंजाळ यांनी दिली. 

सैलानी बसस्थानकाच्या २00 मीटर परिसरात नो पाकिर्ंग झोन भाविकांच्या सोयीसाठी सैलानी येथे तीन तात्पुरते बसस्थानक उभारण्या त आले असून, बस स्थानकाच्या २00 मीटर परिसरात नो पाकिर्ंग झोन  जाहीर करण्यात आले आहे.  सैलानी यात्रेसाठी राज्य परिवहन  महामंडळाने पिंपळगाव सराई परिसरात गट ३८३ आणि पिंपळगाव सराई  ते भडगाव मार्गावर गट नंबर १२0/१२९ तसेच ढासाळवाडी गट नंबर  ३६६ मध्ये बसस्थानकांची उभारणी राज्य परिवहन महामंडळाने केली  आहे. ही नो पाकिर्ंगची अधिसूचना १0 मार्चच्या मध्यरात्रीपयर्ंत लागू  राहणार आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस  कायद्यान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन  जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. 

टॅग्स :Holi 2018होळी २०१८