खामगाव ::- शेतकरी विरोधी असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र शब्दात निदर्शने करीत शेतकरी विरोधी अध्यादेशाची होळी करून निषेध करण्यात आला. *पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या सरकार ने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडविणारे पाऊल उचललेले आहे . मात्र कांग्रेस आणि विरोधक विनाकारण कांगावा करीत आहे . महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोदी आणि फडणविस सरकार ने दिलेले शेतकऱ्यांचे स्वतंत्र हिरावणारा स्थगिती आदेश काढला, आता शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे या सरकारचा निषेध म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात या स्थगिती आदेशाची आज तहसील कार्यालय समोर भारतीय जनता पार्टी खामगाव विधानसभाच्यावतीने होळी करून राज्यातील शेतकरी विरोधी महविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र "निषेध आंदोलन केले. या आंदोलनात भाजपचे किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, शरदचंद्र गायकी, रामदादा मोहिते, नगराध्यक्ष सौ अनिताताई डवरे, न प सभापती, नगरसेवक, जि प सदस्य, प स सदस्य, तालुका , शहराचे पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला आघाडी, विध्यार्धी आघाडी, किसान आघाडी व इतर आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपने केली अध्यादेशाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 6:48 PM