शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

घरकुलाबाबत प्रशासन उदासीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 12:53 AM

नांदुरा : पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागा तील गरिबांना घरकुले उपलब्ध करून देण्यात येतात; परंतु  प्रशासकीय यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्याचे ५१७0  घरकुलांचे उद्दिष्टापैकी दोन महिन्यात केवळ ४0२ घरकुलेच  मंजूर झाली आहेत. बर्‍याच पंचायत समितीमध्ये मागील वर्षाचेही  उद्दिष्ट शिल्लक असून, चालू वर्षातही घरकुलांच्या बाबतीत   उदासीनता दिसत आहे, त्यामुळे घरकुल योजना लाभार्थ्यांपर्यंत  पोहोचते की नाही? याबाबत  शंका उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात दोन महिन्यात केवळ ४0२  घरकुल मंजूर५१७0 पैकी ४0२ घरे मंजूर 

संदीप गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागा तील गरिबांना घरकुले उपलब्ध करून देण्यात येतात; परंतु  प्रशासकीय यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्याचे ५१७0  घरकुलांचे उद्दिष्टापैकी दोन महिन्यात केवळ ४0२ घरकुलेच  मंजूर झाली आहेत. बर्‍याच पंचायत समितीमध्ये मागील वर्षाचेही  उद्दिष्ट शिल्लक असून, चालू वर्षातही घरकुलांच्या बाबतीत   उदासीनता दिसत आहे, त्यामुळे घरकुल योजना लाभार्थ्यांपर्यंत  पोहोचते की नाही? याबाबत  शंका उपस्थित होत आहे.ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास जनतेला पक्की घरे  मिळावी, याकरिता केंद्र शासनातर्फे पंतप्रधान आवास योजना  ग्रामीण तसेच राज्य शासनाच्या रमाई आवास योजना, शबरी  आवास योजना इ. योजना राबविण्यात येतात. यापैकी पंतप्रधान  आवास योजना ग्रामीणमधील प्रपत्र ब यादीतील लाभार्थ्यांना  घरकुलांचे वाटप सुरु असून, २0१७-१८ या वर्षाकरिता  जिल्ह्यास ५१७0 घरकुलांचे उद्दिष्ट असून, सदर उद्दिष्टाचे  तालुकास्तरीय वाटप २८ जुलै २0१७ दरम्यान करण्यात आले.  सध्या उद्दिष्ट वाटपाला दोन महिने उलटूनही ५१७0 पैकी केवळ  ४१५ घरकुलेच मंजूर होऊ शकली असून, पं.स. स्तरावरून  ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालयांना घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस् तावाची मागणी करूनही प्रस्ताव सादर होत नसल्याने घरकुलांचे  लाभार्थी वंचित राहत आहेत.नांदुरा तालुक्यात सन २0१६-१७ मध्ये एससी ३५ व अल्पसं ख्याक ४५ घरकुलांचे उद्दिष्ट अपूर्ण असून, त्यात चालू  २0१७-१८ वर्षात आणखी उद्दिष्ट आले असून, तालुक्यात  २0१७-१८ करिता एससी ३१0, एसटी ३२, अल्पसंख्याक ९७  व इतर १४२ असे ५८१ घरकुलांचे उद्दिष्ट २७ सप्टेंबर रोजी  मिळाले असून, आतापर्यंत इतरच्या १४२ च्या उद्दिष्टापैकी  केवळ २७ घरकुलांना मंजुरात मिळाली आहे. एससी, एसटी व  अल्पसंख्याक प्रवर्गाच्या घरकुलांचा एकही प्रस्ताव सध्या प्राप्त  नाही. त्यामुळे गरिबांना घरे देण्याच्या बाबतीत प्रशासनाची  उदासीनता दिसून येते.

५१७0 पैकी ४0२ घरे मंजूर पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी पं.स. स्तरावर  कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांची नेमणूक केली असून,  घरकुल प्रस्तावांचे  टॅगींग करणे, अनुदान प्रस्ताव तयार करणे व  घरकुलांसंबंधी इतर कामे असून, त्याकरिता त्यांना आधी  घरकुल अनुदानाप्रमाणे तीन टप्प्यात एकूण प्रती घरकुल ७५0 रु.  मानधन देण्यात येत असे. आता घरकुल अनुदान पाच टप्प्यात  झाल्याने सदर ७५0 रुपये अनुदानही पाच टप्प्यात मिळणार  आहे. शिवाय मागील आठ महिन्यापासून अनुदानच मिळाले  नसल्यानेही घरकुल योजनेवर प्रभाव पडत आहे.