बँकांचे गृहकर्ज स्वस्त
स्टेट बँक ऑफ इंडिया ६.७५
बँक ऑफ इंडिया ७.५०
बँक ऑफ महाराष्ट्र ७.०५-७.५०
एचडीएफसी बँक ६.७५-७.२५
आयसीआयसीआय ६.७५
शहरापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग...
- शहरापासून जवळच असलेल्या नवीन वसाहती परिसरात रो-हाऊस, फ्लॅटची बांधकामे सुरू आहेत. शहराच्या तुलनेत शहरापासून दूर घरे स्वस्त आहेत. मात्र, अप-डाऊन करण्यासाठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
- शहरात शाळा, महाविद्यालये जवळ असल्याने अनेकांनी मुलांच्या सोयीसाठी शहरातच राहणे पसंत केले आहे. शहराच्या बाहेर घर घेतल्यास शाळा, महाविद्यालयांत येण्याची सोय नसल्याचेही अनेकांचे मत आहे.
- कोरोनाच्या काळात शहराबाहेर अनेक बांधकामाच्या साईट सुरू झाल्या आहेत. मात्र, अनेकांच्या व्यवसायाला कोरोनाचा फटका बसल्याने नवीन घरांची विक्री होण्यास काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
- दिवाळी, दसरा, अक्षय्यतृतीया या मुहूर्तावर नवीन बांधकामांना प्रारंभ केला जातो. याच मुहूर्तावर नवीन फ्लॅट किंवा रो-हाऊस घेण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र यंदा प्रतिसाद कमी आहे.
साहित्य विक्रेते म्हणतात
गेल्या वर्षभरात बांधकामाच्या साहित्याच्या दरांत वाढ झाली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. सणांच्या मुहूर्तावर अनेकजण नवीन बांधकाम सुरू करीत असत. मात्र, वाढत्या दरामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मंदावला आहे.
- आनंद राठी, साहित्यविक्रेते.
दरवर्षी बांधकाम साहित्याच्या विक्रीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळायचा. मात्र, कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाल्याने नवीन बांधकामे अत्यल्प सुरू आहेत. त्यामुळे साहित्य विक्रेत्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे.
- गणेश जाणव, साहित्यविक्रेते.
घर घेणे कठीणच
कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले. जमा पैशांमधून घर घेण्याचे स्वप्न होते; परंतु बांधकामाच्या साहित्याचे दर वाढल्यामुळे घर घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे महागाई कमी कधी होईल, याची प्रतीक्षा आहे. महागाई कमी झाल्यास घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
- जय त्रिवेदी, नागरिक.
नवीन घर घेण्याचेच ठरवले होते. त्यानुसार आर्थिक नियोजनही केले होते. मात्र, कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. महागाईमुळे बजेट कोलमडले असून, नवीन घर घेण्याचे सध्या तरी स्थगित केले आहे.
- विनोद रोजतकर, नागरिक.
बांधकाम साहित्यात स्वस्ताई नाहीच...
साहित्य २०१८ २०१९ २०२० २०२१(जुलै)
सिमेंट २९० ३०० ३२० ३८०
विटा ४१०० ४२०० ४५०० ६०००
वाळू २८०० ३००० ३५०० ४५००
खडी २३०० २५०० २७०० ३२००
स्टील ४१०० ४३०० ४५०० ५७००