शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमध्ये गृहभेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 3:51 PM

एक लाख ४१ हजार नागरिकांचा सर्वे पूर्ण करण्यात आला.

- अझहर अलीलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमध्ये गृहभेटी देण्यात आल्या. यामध्ये एक लाख ४१ हजार नागरिकांचा सर्वे पूर्ण करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशाखाली आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना राबवली जात आहे. आरोग्य विभाग यंत्रणेतील आशाताई व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने गावांमध्ये सर्वेक्षण करून ताप, खोकला असलेले रुग्ण शोधून त्यांना आरोग्य यंत्रणेच्या निरीक्षणाखाली ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या पाच दिवसात घरोघरी जाऊन ग्रामिण भागात हा गृह सर्व्हे पुर्ण करण्यात आला आहे. यामध्ये संग्रामपूर शहराला वगळण्यात आले असून ग्रामिण भागात गृह सर्व्हे करण्यात आला.यादरम्यान संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमधील १ लाख ३८ हजार ९८६ नागरिकांच्या आरोग्य बाबत माहिती धेण्यात आली. तर मुंबई, पुणे व ईतर महानगरपालिकेतून तालुक्यात २ हजार ४९२ नागरीक आलेले असून एकुण १ लाख ४१ हजार ४७८ नागरीकांची प्रशासनाने माहीती गोळा करून ठेवली आहे. संग्रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३१ हजार ९९९, सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्र ४५ हजार ८८६, पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र २८ हजार २४३, तर तर वानखेड आरोग्य केंद्रा अंतर्गत ३२ हजार ८७८ नागरिकांचा सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेत १ हजार १५६ रक्तदाब, मधुमेह ६४७, क्षयरोग ७२, दमा २९७, हृदय रोग १०७ कर्करोग ४५, अपंग ८९४, गरोधर माता ९७६ तर सर्दी, खोकला, तापीचे ६१७ रुग्ण असल्याचे या सर्वच निष्पन्न झाले. तालुक्यात घरोघरी जाऊन ३७२ अंगणवाडी सेविका व मदतनीस, १०८ आशाताई, तर १६ आरोग्य सेवक असे एकूण ४९६ कर्मचाय्रांनी गृहभेटी देऊन सर्वे केला आहे. संग्रामपूर तालुक्यात सध्या स्थिती कोरोना विषाणू संसगार्ने बाधित एकही रुग्ण नाही. या महामारी ने तालुक्यात पाय पसरू नये यासाठी आधीच योग्य ती खबरदारी आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस