शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
2
"राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
3
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
4
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
5
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
6
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
7
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
8
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
9
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
10
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
11
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
12
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
13
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
14
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
15
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
16
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
17
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
18
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
19
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर

मुलीला जन्म देणा-या पालकांचा होणार सन्मान

By admin | Published: July 10, 2017 8:11 PM

लोणार : जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याच्या मुलींना जन्म देण्या-या पालकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून  मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याच्या मुलींना जन्म देण्या-या पालकांचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली व तालुका स्तरीय पदाधिकारी,अधिकारी यांचे सहकार्याने मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांना भेटी व मार्गदर्शन देऊन १९३४ लायक जोडप्यांना आरोग्य विभागा मार्फत जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वाक्षरी चे बेटी बचाव , बेटी पढाव आवाहन पत्र तसेच नवे पर्व ,नवी दिशा , नवे संकल्प असलेले स्टिकर्स घरोघरी लावण्याचे अभियान ११ ते २६ जुलै राबविण्यात येणार आहे.मुलींच्या जन्मदरात होत असेलेली घट हा चिंतेचा विषय ठरत आहे. मागील काही वर्षांतील आकडेवारीवरूनच हि गंभीर समस्या समोर आली आहे. ही घट मागील दोन वर्षांत झाली अशातलाही भाग नाही. स्वातंत्र्यानंतर आपण याबाबतचा बारकाईने अभ्यास केला तर सुरुवातीपासूनच मुलींच्या जन्मदारात घट होतच आहे,पण समाजात याबाबत जागरूकता राहिली असती तर आज मुलींच्या जन्मदराबाबत जे काही भयाण चित्र दिसत आहे ते दिसले नसते. लोकसंख्या वाढीस आळा घालणे हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून शासन चालत होते. लोकसंख्या वाढीला नियंत्रण करणे हेच एकमेव उद्दिष्ट शासनाने ठेवले यामुळे मुलींच्या जन्मदराकडे तितकेसे लक्ष गेले नाही. यामुळे मुलगी जन्माला आल्यावर मारून टाकणे, दुर्लक्ष करणे किंवा गर्भलिंग चाचणी करून जन्माआधीच तिची यात्रा संपविणे हे सर्रास सुरू होते. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सरकारने अनेक योजना राबविल्या त्यात एकात्मिक बाल विकास योजना ही देशातील सर्वात मोठी योजना आहे. १८ हजार कोटींहून अधिक खर्च या योजनेत केला जातो. या योजनेच्या माध्यमातून गर्भार माता, स्तनदा माता, ० ते ६ वयोगटांतील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्याकडे अधिक लक्ष दिले जाते. तरीही पाहिजे तसे मुलींचा जन्मदर वाढलेले दिसून येत नाही. यामुळे ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून  मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली व तालुका स्तरीय पदाधिकारी,अधिकारी यांचे सहकार्याने मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांना भेटी व मार्गदर्शन देऊन १९३४ लायक जोडप्यांना आरोग्य विभागा मार्फत जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वाक्षरी चे बेटी बचाव , बेटी पढाव आवाहन पत्र तसेच नवे पर्व ,नवी दिशा , नवे संकल्प असलेले स्टिकर्स घरोघरी लावण्याचे अभियान ११ ते २६ जुलै राबविण्यात येणार आहे.              ११ ते २६ जुलै दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानात तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी यांच्यासह आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस व आरोग्य कर्मचारी हि सहभागी होणार आहेत.या अभियानातून मुलींचा जन्म दर वाढण्यास नक्कीच मदत होईल.- डॉ.अनंत पबितवार , तालुका आरोग्य अधिकारी ,लोणार.