लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील विक्रेते मास्क आणि इतर नियमांना तिलांजली देत आहेत. त्यामुळे, नागरिकांनो सावधान! तुम्ही खाद्यपदार्थांसोबत कोरोना विषाणूही विकत तर घेत नाही ना, याची खातरजमा करून घ्या; अन्यथा तुम्ही व तुमच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशीच परिस्थिती सध्या शहरात दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात असला तरी त्याचे संपूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन व इतर यंत्रणांकडून वारंवार मास्क व इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली केली जात आहे; मात्र शहरातील चायनीज, वडापाव, भेळपुरी, अंडाभुर्जी, स्वीट कॉर्न भेळ, फिंगर व इतर पदार्थ विक्रेते कुठेही मास्कचा वापर करताना दिसून येत नाहीत. शासनाच्या नियमांनाच या विक्रेत्यांनी उघडपणे धाब्यावर बसविले असल्याचे चित्र आहे. शहरालगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर ढाबे आहेत. येथेही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. हॅणडवॉश स्टेशन उभारले नसून सॅनिटायझरही ठेवले जात नाही..
खामगाव शहरातील हॉटेल व्यावसायिकांनाही पडला मास्कचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:33 IST
Khamgaon News खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील विक्रेते मास्क आणि इतर नियमांना तिलांजली देत आहेत.
खामगाव शहरातील हॉटेल व्यावसायिकांनाही पडला मास्कचा विसर
ठळक मुद्दे विक्रेते कुठेही मास्कचा वापर करताना दिसून येत नाहीत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.