धाड (बुलडाणा), दि. २९- ग्राम मोहोज येथील शेतकरी देवराव लक्ष्मण नप्ते यांच्या शेतात असणार्या घरास २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास आग लागून दीड लाखांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेमुळे ते बेघर झाले आहेत.मोहोज येथील देवराव लक्ष्मण नप्ते हे आपल्या शेतात गट नं.१६ मध्ये राहत होते. २८ मार्च रोजी ७.३0 वाजता सायंकाळी घरास आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केले. या ठिकाणी घरावरचे टिनपत्रे बैलगाडी, पाइप, केबल, लग्न कापड, १५ हजार रोख, ७ पोते गहू, सहा पोते हरभरा, एक पोते तूर, एक पोते सोयाबीन, मंगळसूत्र, कृषी अवजारे असा १ लाख ६५ हजार ३00 रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. घटनेचा पंचनामा एस.व्ही. जगताप यांनी केला. शेतकर्यास नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
घराला आग; दीड लाखांचे नुकसान
By admin | Published: March 30, 2017 2:22 AM