लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरानाची दुसरी लाट आता अेासरली असली तरी कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे सध्या सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. त्यातच बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या ५.५० टक्के नागरिकांनीच दोन्ही डोस घेतल्यामुळे डेल्टा प्लसला रोखण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या आरोग्य विभागाला लसीकरणाचाही वेग वाढवावा लागणा आहे. सुदैवाने अद्याप बुलडाणा जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही कोरोना संक्रमीत रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र या घातक विषाणूचा अन्यत्र झालेला शिरकाव पाहता लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आरोग्य विभागासमोर आव्हान आहे. सध्या जिल्ह्यातील १०७ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २०११ च्या जनगननेनुसार २५ लाख ६० हजारांच्या घरात आहे. यापैकी २१ लाख ४६ हजार ९५ नागरिकांच्या लसीकरणाचे आरोग्य विभागाने उदिष्ट ठेवलेले आहे. यापैकी आतापर्यंत ६ लाख २९ हजार ९२ जणांनी कोरोना प्रतिबंधासाठीची लस घेतलेली आहे. हे प्रमाण एकूण २४ टक्के असले तरी कोरोना प्रतिबंधासाठीच्या लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या अवघी ५.५० टक्के म्हणजेच १ लाख ४० हजार ८७७ आहे. तर किमान एक डोस घेणाऱ्यांची संख्या ४ लाख ८८ हजार २१५ असून त्याची टक्केवारी ही १९.०७ आहे. त्यामुळे दुदैवाने डेल्टा प्लस या म्युटेशन झालेल्या कोरोना व्हायरस जर जिल्ह्यात सापडला तर आरोग्य विभागासमोरील डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१८ ते ४४ वयोगटात ०.२२ टक्केच लसीकरण जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील जवळपास १२ लाखांच्या आसपास नागरिक आहेत. त्यापैकी दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ही २ हजार ७२५ जणांनीच दोन्ही डोस घेतलेले आहेत. या वयोगटात आतापर्यंत नोंदणी केलेल्या १ लाख १ हजार २०४ जणांनी पहिला डोस घेतलेला आहे.४५ वर्षावरील व्यक्तींचे ११ टक्के
जिल्ह्यातील ४५ वर्षावरील व्यक्तींचे ११.७७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अर्थात १ लाख ४ हजार ६६५ व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहे. पहिला डोस ३ लाख ४ हजार ७५३ (३४ टक्के) जणांनी घेतलेला आहे. ४५ वर्षावरील ९ लाख ८९ हजार २६६ जणांचे लसीकरण करण्याचे आरोग्य विभागाचे उदिष्ट आहे.