पायी चालायला भीती
बुलडाण्यातील मुख्य बाजार लाइन रस्त्यावर सर्वाधिक वाहनांची गर्दी असते. दोन्ही बाजूंनी वाहने आल्यास पायी चालणाऱ्या व्यक्तीने जावे तरी कोठून, असा प्रश्न उपस्थित होतो. काही व्यक्ती रस्त्यावर वाहने उभी करतात, त्यामुळे या रस्त्याने चालणेही कठीण होऊन जाते.
प्रभाकर वाघमारे
अपघाताची भीती
बाजार लाइन रस्त्याने वाहन लावताना अपघातांची भीती वाटते. रस्त्यावरील गर्दी आणि त्यात वाहनांची वर्दळ यामुळे या रस्त्याने वाहने लावणे कठीण झाले आहे.
गजानन चव्हाण.
ग्राहकांची वाहने रस्त्यावर
दुकानदारांनी रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहनांना पार्किंगसाठी जागाच शिल्लक राहिली नाही. परिणामी दुकानांमध्ये येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी ठेवतात. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
हजारो वाहनांची वर्दळ
बुलडाण्यातील बाजार लाइन मार्गावर हजारो वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर बँका, दुकाने, निमशासकीय, शासकीय कार्यालये आहेत. तसेच शहरातील २५ टक्के वस्तीमध्ये या मार्गाने प्रवेश करता येतो. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. सध्या कोरोनामुळे निर्बंध असले तरी या मार्गावरील वर्दळ कमी झाली नाही.
परिसरातील नागरिक त्रस्त
रस्त्यावरील गर्दीमुळे या परिसरात राहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या घरापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाऊ शकत नसल्याचे चित्र आहे. वाहतूक कोंडीने या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडी झाल्यानंतर या ठिकाणी एकही वाहतूक शाखेचा कर्मचारी दिसून येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा किरकोळ वादही होतात.