लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल ३० मे रोजी जाहीर होणार असून, या निकालानंतर जिल्ह्यातील ३३ हजार विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य निश्चित होणार आहे. फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये झालेल्या इयत्ता बारावीची परीक्षा जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील ९८ परीक्षा केंद्रांवरुन घेण्यात आल्या. यात नियमित ३२ हजार ३७९ आणि पुन:परीक्षार्थी १३९४ अश्या एकूण ३३७७३ विद्यार्थी सहभागी झाले होते. ३० मे रोजी निकाल जाहीर होणार असल्यामुळे बारावीत किती टक्के गुण मिळणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सदर निकाल हा विद्यार्थ्यांना आॅनलाइन पहायला मिळणार आहे, तर चार ते पाच दिवसांनी शाळा - महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका येणार आहेत.
आज बारावीचा निकाल
By admin | Published: May 30, 2017 12:55 AM