लोकमत न्यूज नेटवर्कदेवधाबा : येथून जवळ असलेल्या पिंपळखुटा महादेव येथे व्याघ्रा नदीच्या पात्रात अज्ञात पुरूष जातीचा मानवी सांगाडा आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबतची फिर्याद पिंपळखुटा महादेवचे पोलीस पाटील रतनसिंग पर्वतसिंग मोरे (वय ५५) यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला १ जून रोजी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मर्ग नं.१५/१७ सीआरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. सदरच्या इसमाचे मृत्यूचे नेमके कारण समजून येत नसून, अज्ञात इसमाचा सापळा कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात उलट-सुलट चर्चांना पेव फुटले आहे.
कुजलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2017 1:05 AM