- अनिल गवईखामगाव : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाच्यावतीने बुधवारी रुटमार्च काढण्यात आला. या मार्च दरम्यान, एका मुस्लिम युवकाची अंत्ययात्रा निघाली, असता शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या निरिक्षकांनी युवकाच्या अंत्ययात्रेला खांदा देवून माणुसकीचे दर्शन घडविले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आणि शिवाजी नगर पोलिसांच्यावतीने बुधवारी रूटमार्च काढण्यात आला. निवडणुकी दरम्यान, शहरात सुरक्षीततेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी या रूटमार्चचे आयोजन केले गेले. दरम्यान, हा रूट मार्च शहरातील निर्मल टर्निंगवर पोहोचला असता, एका मुस्लिम युवकाची अंत्ययात्रा मस्तान चौकाकडे जात होती. त्यावेळी हा रूट मार्च निर्मल टर्निंगवर थांबविण्यात आला. दरम्यान, या मुस्लिम युवकाच्या अंत्ययात्रेला खांदा देत, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक रविंद्र देशमुख यांनी खांदा देत माणुसकीचे दर्शन घडविले.
अंत्ययात्रेसाठी थांबविला रूट मार्च!
रूटमार्चच्या दरम्यान, मुस्लिम युवकाची अंत्ययात्रा आल्याने, पोलिसांनी आपला रूट मार्च थांबविण्याचा निर्णय घेतला. अप्पर पोलिस अधिक्षक हेमराज राजपूत, विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक रविंद्र देशमुख यांच्यासह केंद्रीय राखीव दल, दंगाकाबू पथक, स्टायकिंक फोर्स, रॅपीड अॅक्शन फोर्सच्या पोलिस या रूटमार्च मध्ये सहभागी झाले.