विवेक राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कएकलारा बानोदा: संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील ग्रामदैवत संत खोटेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी आयोजित रथोत्सवात भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. २५ फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी संत खोटेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये अखंड दिवा व वीणा नाद सुरू होऊन ५0 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त सुवर्ण महोत्सवी सोहळा म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ३ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आला. नऊ दिवस कीर्तन, हरिपाठ, काकडा, प्रवचन, व्याख्यान आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठ नेतृत्व बाळकृष्ण महाराज भोंडेकार आळंदी देवाची यांच्या मधुर वाणीतून करण्यात आले. तसेच शनिवारी सकाळी ११ वाजता संत खोटेश्वर महाराजांचा रथाची गावामधून मिरवणूक काढण्यात आली. रविवारी ११ वाजतर रथ मंदिरामध्ये आल्यानंतर काल्याचे कीर्तन व दहीहांडी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथे रथोत्सवानिमित्त भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:15 AM
एकलारा बानोदा: संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील ग्रामदैवत संत खोटेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी आयोजित रथोत्सवात भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. २५ फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देखोटेश्वर महाराज पुण्यतिथिनिमित्त आज महाप्रसाद