शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

दीड हजार घरकुलांच्या वाटपाचा तिढा सुटणार!

By admin | Published: May 18, 2017 12:02 AM

नवीन लाभार्थी यादीच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे म्हाडास पत्र

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरात निर्माण करण्यात आलेल्या घरकुलांच्या नवीन प्रतीक्षा यादीस मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ‘म्हाडा’शी पत्रव्यवहार केला असून, एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत निर्मित या घरकुलांचे वाटप पात्र लाभार्थींना केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील १४३० घरकुलांना आता हक्काचे मालक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे दिसून येते.शहरातील नागरिकांना घरकुलाची सुविधा देण्यासाठी खामगाव पालिकेच्यावतीने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम टप्पा-१ अंतर्गत १४३० घरकुलांचे निर्माण करण्यात आले. या घरकुलांची निर्मिती करण्यापूर्वी शहरात विशेष सर्वेक्षण करून योजनेला सन २००७-०८ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सन २०१० मध्ये सुमारे २७ कोटी रुपयांच्या खर्चातून घरकुलांची निर्मिती करण्यात आली. मात्र, या घरकुलांचे बांधकाम पूर्णत्वास आल्यानंतर घरकुलांचा ताबा घेण्यासाठी संबंधित लाभार्थींनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे सुमारे २७ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या १४३० घरकुलांपैकी बहुतांश घरकुलं ओस पडली होती, तर काही घरकुलांमध्ये अतिक्रमण झाले होते. अशा परिस्थितीत घरकुल वाटपाचा कायदेशीर पेच निर्माण झाल्याने, पालिका प्रशासनाकडून या घरकुलांच्या वाटपासाठी फेर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार तयार करण्यात आलेली सुधारित लाभार्थी यादीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. तसेच यासंबंधी संपूर्ण वस्तुस्थिती पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना अवगत करून देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रस्तावाबाबत उपअभियंता म्हाडा, उपविभाग अकोला तथा सदस्य सचिव, जिल्हा गृहनिर्माण अधिकारी अकोला यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.नवीन यादीत १२९२ लाभार्थी!शहरात १४३० घरकुलांच्या निर्मितीनंतर केवळ १३८ लाभार्थींनी या घरकुलांचा ताबा घेतला. दरम्यान, उर्वरित १२९२ लाभार्थींनी घरकुलाचा लाभ घेण्यास नकार दिला. घरकुलाचा ताबा नाकारणाऱ्या लाभार्थींनी, पक्के घर बांधले, स्थानांतरण केले, राहते घर सोडून जाण्याची इच्छा नाही, या योजनेचा लाभ नको, वैयक्तिक कारणांमुळे, अशी पाच कारणे लेखी दिली. त्यानंतर पालिका प्रशासनाने १२९२ जणांची सुधारित लाभार्थी यादीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या घरकुल वाटपाचा तिढा निर्माण झाला होता. लाभार्थींनी नकार दिल्यानंतर फेर सर्वेक्षण करण्यात आले. या फेर सर्वेक्षणानुसार विस्तृत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. वरिष्ठ पातळीवर हिरवी झेंडी मिळाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.- प्रशांत रोडे, मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.शहरात निर्मित घरकुलांचा विनियोग करण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत. पालिका प्रशासनासोबतच जिल्हा स्तरावरूनदेखील घरकुल वाटपाचा तिढा सोडविण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाचे आहेत. -एम.एम. महीतकर, वरिष्ठ लिपिक, नगर परिषद, खामगाव.