नीलेश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळातर्फे देशव्यापी हायड्रोकार्बनचा शोध घेण्यात येत असून, जालना, औरंगाबाद जिल्हय़ातील सेस्मिक सर्व्हे पूर्णत्वास गेला आहे, तर नांदेड जिल्हय़ात दोन आठवड्यात हा सर्व्हे पूर्णत्वास जाईल. आता बुलडाणा जिल्हय़ातील मेहकर, लोणार तालुक्यांसह वाशिम आणि हिंगोली जिल्हय़ातील या सर्व्हेस प्रारंभ होत आहे. या चारही जिल्हय़ातील सर्व्हे पॉइंटच्या आधारावर निर्माण होणारी ‘२ डी इमेज’ ही हायड्रोकार्बनच्या या भागातील अस्तित्व दाखविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.राज्यात सप्टेंबर २0१६ पासून कृष्णा आणि गोदावरील खोर्यात त्या दृष्टीने शोध मोहीम व्यापक करण्यात आली. देशातील ज्या भागात यापूर्वी असे सर्व्हे झालेले नाहीत, अशा भागाला यात प्राधान्य देण्यात येऊन जमिनीत यंत्राद्वारे खोदकाम करून जीओफोन सेंसरच्या मदतीने येणार्या कंपनाच्या आधारावर २ डी आणि ३ डी इमेजेस प्राप्त करून त्याच्या आधारावर वैज्ञानिक हायड्रोकार्बनचा शोध घेणार आहेत. या इमेजेसच्या आधारे विश्लेषण करून प्रत्यक्ष हायड्रोकार्बनचा शोध घेण्यासाठी जवळपास दहा वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे या संदर्भात काम करणार्या अल्फाजीओ एजन्सीच्या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या आटीवर माहिती दिली. संबंधित कंपनी फक्त डाटा कलेक्ट करून तो पेट्रोलियम मंत्रालयाला सादर करणार आहे. गोदावरी, कृष्णा नदी खोर्यात हायड्रोकार्बनचे अस्तित्व असण्याची शक्यता यातून तपासण्यात येत आहे.
शहरी भाग वगळलाशहरी भागातून असे पॉइंट जात असतील तर त्या भागाला या सर्व्हेमधून वगळण्यात आले आहे. संभाव्य धोका व नुकसान टाळण्यासाठी शहरापासूनचा एक ते दीड किलोमीटरचा पट्टा यातून वगळण्यात आला असल्याचे अल्पाजीओ एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले.
जमिनीखाली करणार नियंत्रित स्फोटलोणार, मेहकर तालुक्यात वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या जमिनीवर प्रारंभी झालेल्या सर्व्हेच्या आधाराने २५0 पॉइंटचे मार्किंग करण्यात आले असून, या ठिकाणी जमिनीमध्ये विशिष्ट र्मयादेत यंत्राद्वारे खोदकाम करण्यात येईल. दीड ते दोन किलो स्फोटकाचा त्यामध्ये नियंत्रित स्वरुपात जमिनीखाली स्फोट करण्यात येऊन लगतच्या भागात लावलेल्या जीओफोन सेंसरद्वारे कंपनांचे रिडींग घेण्यात येऊन त्या आधारावर २ डी इमेजेस निर्माण होतील. हा डाटा पेट्रोलियम मंत्रालयास पाठविण्यात येईल.
केजी खोर्यात तपासणीकृष्णा-गोदावरी खोर्यात एकाच वेळी हायड्रोकार्बनच्या संभावनेबाबात हा सर्व्हे आहे. जालना जिल्हय़ातील तो पूर्ण झाला. तेथील तळणी गावापासून लोणार सरोवरच्या पूर्व काठालगतच्या भागासह मेहकर शहराजवळून जात वाशिम जिल्हा व नंतर हिंगोली जिल्हय़ात निर्धारित केलेल्या रेषेमध्ये प्रत्येक पॉइंटवर खोदकाम करून या चार जिल्हय़ातील निर्धारित पॉइंटवरील नियंत्रित स्फोटच्या आधारावर मिळणार्या कंपनाद्वारे २ डी इमेजेस बनविण्यात येणार आहेत.
परवानग्यांसाठी धावपळया सर्व्हेसाठी अवजड यंत्रणेसह, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तथा स्फोटकांचे साहित्य हाताळावे लागत असल्याने वन विभागासह, पोलीस प्रशासनाची स्थानिक पा तळीवरील परवानगी आवश्यक आहे. वन विभागाला त्या संदर्भातील नकाशाही देण्यात आला असून, त्या दृष्टीने सध्या यंत्रणेची धावपळ होत आहे. नाही म्हणायला केंद्र व राज्य शासनाची परवानगी या सर्व्हेसाठी आधीच प्राप्त झालेली आहे; पण स्थानिक पातळीवर काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या परवानग्या काढण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोणार, मेहकर तालुक्यात वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळताच कामास प्रारंभ होईल.