ते साखरखेर्डा येथील पलसिद्ध मठात आयोजित कोरोनायोद्ध्यांच्या सन्मानप्रसंगी बोलत होते.
येथील गोपाल मानतकर यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त सर्व विवाह सोपस्कार बाजूला सारून मानतकर परिवाराने कोरोनाकाळात कोरोनायोद्धा म्हणून कार्य केलेले वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, पत्रकार, लाइनमन आदींचा सन्मान यावेळी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वयोवृद्ध डाॅ. सुखदेव मानतकर हे होते. पहिल्या लाटेत नागरिकांनी नियम संयम राखला. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होते. रुग्णही कमी होते. दुसऱ्या लाटेत नियम न पाळता गर्दी करणे, मास्क न लावने यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली. मृत्यूचे प्रमाणही वाढले. तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली असून, आता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केले.
यावेळी मेडिकल असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर, जिल्हा परिषद सदस्य राम जाधव, माजी सभापती राजू ठोके, सरपंच दाऊत कुरेशी, गजानन बंगाळे, सय्यद रफीक आदी उपस्थित होते. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी, साखरखेर्डा येथील सर्व डाॅक्टर, मेडिकल असोसिएशनचे सदस्य, आशा सेवीका, आरोग्य सहायक, सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन शिवानंद वाकदकर यांनी केले.
अनाथाला मदतीचा हात
शिंदी येथील आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी स्व. गीता बुरकूल यांना उपकेंद्रात सर्प दंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता त्यांचा एकुलता एक मुलगा अनाथ झाला. शिक्षणाची आणि इतर तरतूद व्हावी, यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने ८५ हजार रुपये आणि पालकमंत्री यांनी १० हजारांची मदत यावेळी त्या मुलाला दिली.