लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव (बुलडाणा): कर्जमाफीसह शेतकºयांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ दिवाळीपूर्वी मिळाला नाही तर साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा लोणी गवळी येथील शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाव्दारे दिला आहे. मेहकर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर यांना महाराष्ट्र राज्य सरकार यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची तत्काळ अंमलबजावणी करुन दिवाळीपूर्वी रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करावी. तसेच सन २०१६ नंतर कर्जभरणा करणाºयांना सदर कर्जमाफी योजनेमध्ये समाविष्ट करुन सरसगट कर्जमाफी द्यावी. एकाच कुटूंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ मिळेल ही अट रद्द करुन ज्याच्या नावे सातबारा व कृषी कर्ज आहे, अशा सर्व कुटूंब सदस्य शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, शेतकºयांना आधारकार्डाची सक्ती न करता कर्जामाफीचा लाभ देण्यात यावा, तसेच शेतकरी पिक योजनेमध्ये नुकसानधारक शेतकºयांनी नुकसान झाल्याझाल्या ४८ तासात नुकसानीचा पंचनामा करुन अहवाल पाठविण्याची अन्यायकारक अट तत्काळ रद्द करावी, आदी मागण्या शेतकºयांनी केल्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास उपविभागीय अधिकारी मेहकर यांचे कार्यालयासमोर परिसरातील शेतकºयांसह ९ आॅक्टोबरपासून साखळी उपोषणास बसणार असल्याचे निवेदन लोणी गवळी येथील शेतकरी प्रशांत पाटील व संतोष भांबे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
शेतक-यांच्या मागण्या मान न झाल्यास साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 8:18 PM
डोणगाव (बुलडाणा): कर्जमाफीसह शेतकºयांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ दिवाळीपूर्वी मिळाला नाही तर साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा लोणी गवळी येथील शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाव्दारे दिला आहे.
ठळक मुद्देलोणी गवळी येथील शेतक-यांचे जिल्हाधिका-यांना निवेदनयोजनांचा लाभ दिवाळीपूर्वी मिळाला नाही तर साखळी उपोषण