खामगाव : शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर परिवाराचा उदरनिर्वाह चालविता यावा, यासाठी सरकारने जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागणीसाठी राज्यभरातील जवळपास १८ लाख कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून संप पुकारला आहे. शासनाकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी निधी नसेल तर, वेळप्रसंगी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींची पेन्शन बंद करावी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, असे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी म्हटले.
खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस जणांच्या वतीने हाताला काळया फिती बांधून निदर्शने करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी केंद्रात राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे डबल इंजिन सरकारला निधीची कुठलीच कमतरता नाही, असे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सदैव सांगत असतात. त्यामुळे जुनी पेन्शन योजना तात्काळ सुरू करावी,अशी मागणी केली.
यावेळी खामगाव तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, शेगाव तालुकाध्यक्ष विजय काटोले, सुरेशसिंह तोमर, पंजाबराव देशमुख, श्रीकृष्ण टिकार, चैतन्य पाटील, इनायतउल्लॉ खा, मनीष देशमुख, किशोरआप्पा भोसले, वाडीचे सरपंच विनोद मिरगे, गणेश ताठे, सुभाष पेसोडे, शेख जुल्कर शेख चाँद, अनंता धामोडे, अनंता सातव, तुषार इंगळे, प्रीतम माळवंदे, आशिष देशमुख, ईश्वर राणा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.