शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

गाव समृद्ध झाले तर लोकांना विस्थापित होण्याची गरज पडणार नाही - भटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:04 AM

नवीन मोदे सत्यमेव जयते ते वॉटर फाउंडेशन हा प्रवास कसा झाला ? सत्यमेव जयते हा कार्यक्रम सामाजिक प्रश्नावर आधारित ...

नवीन मोदे

सत्यमेव जयते ते वॉटर फाउंडेशन हा प्रवास कसा झाला ?

सत्यमेव जयते हा कार्यक्रम सामाजिक प्रश्नावर आधारित होता. त्या वेळी देशातील विविध भागातील समस्या तसेच त्यासाठी अहोरात्र काम करणारे अनेक लोक भेटली ही लोक त्या त्या ठिकाणी काम करत होती. त्यावेळी एखादा प्रश्न लावून धरून त्याचे जनआंदोलनात रूपांतर करून ती समस्या सोडवण्याचा आमिर खान यांनी विचार मांडला व त्यातूनच पाणी फाउंडेशनची पुढची वाटचाल सुरु झाली.

पाणी फाउंडेशनच्या आजपर्यंतची वाटचाल किती यशस्वी झाली असे तुम्हाला वाटते?

लोक एकत्रित येऊन काम करू शकतात हे यातून सिद्ध झाले. ही फक्त सुरुवात आहे. अजून खूप मोठा लढा बाकी आहे. जनआंदोलनातून गावे समृद्ध होऊ शकतात हा आत्मविश्वास मिळाला.

समृद्ध गाव स्पर्धेची नेमकी संकल्पना काय आहे ?

जलव्यवस्थापन जल व मृदासंधारण, गावकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, जंगल निर्मिती, मातीचे आरोग्य सुधारणे व गवताचे संरक्षित कुरण निर्माण करणे या प्रश्नावर काम केल्याशिवाय गावात समृद्धी येणार नाही, नेमके यावरच समृद्ध गाव स्पर्धेमध्ये काम होणार आहे .

जलयुक्त शिवार योजना बंद करण्यात आली आहे, त्याचा काही परिणाम होईल का ?

जलयुक्त शिवार योजना अतिशय चांगली योजना होती. जलसंधारणासाठी ती उपयोगी पडली. परंतु आजही अनेक योजना आहेत त्यातूनही अनेक चांगली कामे होऊ शकतात यात शंका नाही.

पाणी फाउंडेशनच्या कामाला सर्वांचे सहकार्य मिळाले का?

नक्कीच सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांनी सहकार्य केले. अनेकांचे पाठबळ मिळाले शासन-प्रशासन खंबीरपणे पाठीशी उभी राहिले. शेवटी हे जन आंदोलन आहे .

पाणी फाउंडेशनच्या आजपर्यंतच्या वाटचालीबाबत आपण समाधानी आहात का ?

समाधानी आहे असे म्हटले तर चळवळ संपून जाईल. परंतु योग्यरितीने वाटचाल सुरू आहे एवढेच मी सांगू शकतो. मी तर म्हणेल फक्त ही एक सुरुवात आहे. पाणी फाउंडेशन सारख्या अनेक उपक्रमांची महाराष्ट्राला गरज आहे. स्वप्नातला गाव निर्माण व्हावीत, जगातून लोक ती पहायला यावे एवढा बदल घडवण्याची कुवत गावातील लोकात आहे हे निश्चित.