- नीलेश जोशी
बुलडाणा: नाटक करणारे राजकारणात जास्त दिवस टिकत नाही. नाटक आपल्याला जमतही नाही. आपण कितीही मोठ झालो तरी अहंकार येऊ देऊ नका. तो आला तर दिल्ली सारखं होत आणि अहंकारावर नम्रता, लोकहिताचे निर्णय, लोकसंवादाचा विजय होतो हे आपण नुकतच पाहल आहे, असा खरमरीत टोला आ. रोहीत पवार यांनी बुलडाणा येथे केंद्रातील भाजप सरकारला नाव न घेता लगावला. निमित्त होते राजर्षी शाहू फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी आयोजित केलेल्या ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे. जवळपास अडीच तास बुलडाणा जिल्ह्यातील युवक, युवतींच्या मनात सलत असणाºया आणि भविष्याचा वेध घेणाºया प्रश्नांना आ. रोहीत पवार यांनी तितक्याच दिलखुलासपणे उत्तरे दिली. शेवटी आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी महाराष्ट्र व देशातील परिस्थितीचा अंदाज घेणारे वक्तव्य करत राजकीय कोपरखळ््यांनी राजकीय परिपक्वतेची चुणूकच दाखवली. ‘अहंकार’ मुद्दा केंद्रस्थानी ठेवत वैयक्तीक जीवनातही तो नको. तसे झाल्यास १०० मार्कच्या पेपरमध्ये ११० टक्के मार्क मिळणार असे म्हंटल्या जाते आणि मग ते ‘२२० च्या आकडे सारखे होऊन जाते. मग अपेक्षीत न मिळता १०० वरच थांबाव लागत!’ अस म्हणत भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावताच कार्यक्रमात सर्वत्र हशा पिकला. सध्याच सरकार हे ‘आपल सरकार आहे.’ युवा वर्गाला या सरकारकडून अपेक्षा आहे आणि सरकारनेही त्या पूर्ण केल्या पाहिजेत. ‘हे सरकार आपल आहे. ते पुन्हा येईल, पुन्हा येईल अस त्यांच्या सरकार सारख नाही’ अशी मिश्लीक टोलेबाजीही आ. रोहीत पवार यांनी केली.
बजेटमध्ये अनेक सकारात्मक निर्णय
आगामी काळातील राज्याच्या अर्थसंकल्पामध्येही अनेक लोकल्याणकारी सकारात्मक निर्णय अपेक्षीत आहेत. त्यातील काही निर्णय आपल्या अपेक्षेपेक्षाही वेगळे राहतील तर काही आपल्याला न रुचनारेही राहतील. मात्र या ‘आपले सरकार’ने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. नुसतेच निर्णय घेऊन हे सरकार थांबलेले नाही तर त्याच्यावर कामही सुरू आहे. अर्थसंकल्पातही त्याचा प्रत्यय येईल. काही निर्णय अपेक्षेपेक्षा वेगळे मात्र सरस राहतील असे ही ते म्हणाले. दरम्यान भविष्य आपल आहे. कष्ट करावे लागतील. शिक्षण पद्धतीत बदल गरजेचा आहे. तो १०० टक्के होईल, हे सरकार ते करेल, अशी अशाही त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली.