जिल्ह्यात मोजक्याच फोटोग्राफरकडे स्वत:चे ड्रोन आहे. परंतु, बहुतांश फोटोग्राफर भाड्याने ड्रोन घेऊन शुटिंग करतात. शहराचे चित्रीकरण करायचे असेल, तर जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ड्रोनद्वारे शुटिंग करण्यापूर्वी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
ड्रोन उडवण्यासाठी लायसन हवे !
१. ड्रोनद्वारे चित्रीकरण करणे, ते वापरासाठी संबंधितांकडे लायसन्स असणे गरजेचे आहे.
२. सार्वजनिक ठिकाणावर ड्रोन उडविण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते.
३. विमानतळ परिसरात ड्रोनद्वारे शुटिंग करण्यास मनाई करण्यात येते.
कोरोनामुळे व्यवसायच आलेत डबघाईला.
कोरोनामुळे लग्न समारंभ बंद असल्याने फोटोग्राफर व संबंधित व्यवसाय डबघाईला आले आहेत. त्यात काही ठिकाणी ऑर्डर मिळाली, तर विविध परवानगी घेऊनच शुट केले जाते.
-रविकिरण टाकळकर, फोटोग्राफर
प्री वेडिंग किंवा वेडिंग शुटिंग ड्रोनद्वारे असेल, तर त्यासाठी संबंधितांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. अन्यथा संबंधितांवर कारवाई होऊ शकते. ड्रोनद्वारे शुटिंग करण्यासाठी दहा ते वीस हजार रुपये खर्च येतो. परंतु, त्यानंतरच्या एडिटिंगसाठी लागणारा खर्च अधिक असतो.
ड्रोन वापरण्याचे नियम
सार्वजनिक कार्यालय अथवा शहराचे चित्रीकरण करण्यास संबंधित अधिकारी, प्रशानाची परवानगी घेणे आवश्यक.
ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण आणि त्यासाठीचे लायसन्स असणे आवश्यक आहे. तरच शुटिंग करू शकता.
रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी परिसरात विनापरवाना शुटिंग करता येत नाही. त्यासाठी परवानगी गरजेची आहे.
शुटिंगसाठी परवानगी घेतल्यानंतरदेखील किती उंचावर ड्रोन घेऊन जाऊ शकता या विषयीदेखील परवानगी असणे आवश्यक आहे.
शासनाच्या नियमानुसार देशात २५० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे ड्रोन वापरण्याची अनुमती देण्यात आली आहे. लग्नातील शुटिंगसाठी दोन्ही बाजूच्या घरमालकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कोणी आक्षेप घेतल्यास अडचण निर्माण होऊ शकते.