देऊळगाव राजा : देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनासह चार लाखांचा मुद्देमाल देऊळगाव राजा पाेलिसांनी १७ जुलै राेजी जप्त केला़ या प्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
देऊळगाव राजा शहरातील संजयनगर भागात अवैधरीत्या देशी दारू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली़ या माहितीच्या आधारे पाेलिसांनी कार क्र. एम एच १२ एक्स ८५६० अडवली, तसेच कारची तपासणी केली असता ७८ हजार ३६० रुपयांची दारू, कार किंमत तीन लाख रुपये असा एकूण ३ लाख ७८ हजार ३६० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला़ या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी आरोपी वसंता नारायण हंडे (रा़ गणपती मंदिराजवळ जालना), रणजित अशोक यज्ञकर (रा़ संजयनगर देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बसवराज तमशेट्टे करीत आहेत़