लोकमत न्यूज नेटवर्कदुसरबीड : किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या ग्राम लिंगा, पिंपळगाव कुडा येथे अवैध देशी दारु येणार असल्याचे माहितीवरुन ठाणेदार सेवानंद वानखडे यांना यांच्या नेतृत्वात टाकलेल्या धाडीत ३५ बॉक्स देशी दारुसह ८ लाख ७८ हजार ५१६ रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई बुधवारी करण्या त आली.याबाबत मिळालेल्या महितीवरून सहायक पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर शेरकी, पोहेकॉं शेषराव सरकटे, दत्तात्रय लोढे, पोकॉं जाकेर पठाण, विनायक मोरे, ड्रायव्हर पोलीस नाईक, गजानन साळवे यांनी जउळका व पिंपळगाव कुडा दरम्यान सापळा रचुन महिंद्रा पिकअप क्रमांक एम.एच.२१ एक्स ८१७४ व त्याला पायलटींग करीत असलेली मोटारसायकल क्रमांक एम.एच. २८ ए.एल ५७७३ अशी वाहन थांबवून वाहनाची झडती घेतली. यावेळी जिपमध्ये एकूण ३५ बॉक्स देशी दारु, त्यामध्ये १६८0 देशी दारुच्या शिश्या किंमत ८७ हजार २५६ रुपये, जिप क्रमांक एम.एच.२१ एक्स ८१७४ किंमत ७ लाख ५0 हजार रुपये, मोटार सायकल क्रमांक एम.एच. २८ ए.एल ५७७३ किंमत २५ हजार रुपये जप्त केले. यावेळी आरोपी जयराम राघु राठोड रा. गारखेड ता. सिंदखेडराजा, बद्रीनाथ बाजीराव मिसाळ रा.चिंचोली बावणे ता.सिंदखेराजा यांच्याकडून नगदी १६ हजार २६0 रुपये, प्रंशात किसन काळे. रा. चिंचोली बावणे ता. सिंदखेराजा, अविनाश संजय अंभोरे रा.चिंचोली बावणे ता. सिंदखेराजा यांच्च्याकडून ८ लाख ७८ हजार ५१६ रुपयाचा मुद्देमाल आरोपीसह जप्त करून पोलीस स्टेशन किनगावराजा येथे कलम ६५(ई), ६५(ए), ८३ (ए) म.प्रो.का.सह कलम १७७ मोटार वाहन कायदा १९९८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जप्त करण्यात आलेली अवैध देशी दारु कोठुन आणली व कोठे नेणार होते, बाबत सखोल त पास करण्यात होऊन दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे व गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोड व उपविभागीय पोलीस अधिकारी दे. राजा. बी .एन. नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अमडापूर येथे देशी दारुचा २८ हजाराचा माल जप्त अमडापूर : मंगरुळ नवघरे येथून दोन जण मोटारसायकलवर देशी दारुच्या शिश्या नागझरी ता.खामगाव येथे घेऊन जात असल्याची माहिती अमडापूर पोलिसांना मिळाल्यावरुन पोलिसांनी अमडापूर पेट्रोल पंपासमोर नाकाबंदी करुन २८ हजाराच्या मालासह दोन जणांना अटक केली आहे.४ ऑक्टोबर रोजी २0१७ रोजी दुपारी ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ उमेश भोसले, पोकाँ सतीश नागरे यांना मंगरुळ नवघरे येथून मोटारसायकल क्र.एम.एच.३९ वफ ६९0६ यावर आरोपी संतोष मंजा वय २६ वर्षे रामराज चंद्रभान कटकवाघ वय २४ वर्ष रा.नागझरी ता.खामगाव यांना अमडापूर पेट्रोल पंपाच्या समोर पकडून मोटारसायकल किंमत २५ हजार रु पये व देशी दारुच्या ७५ नग शिश्या असा एकूण किमती २८९00 रु. माल रंगेहात पकडून आरोपी विरुद्ध कलम ६५ ई प्रमाणे दारु बंदी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करुन मोटारसायकलसह दारु जप्त करण्यात आली.