खरीप पीक विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
धामणगाव बढे : खरीप हंगाम संपून चार महिने लोटले असतानासुद्धा व शेतकऱ्यांचेे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे असताना पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना कवडीचीसुद्धा मदत पीक विमा कंपनीकडून झाली नाही. शासन स्तरावरसुद्धा कुठल्याही हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळेे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शकीलखान पठाण यांना सुवर्णपदक
बुलडाणा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलडाणाचे मुक्त विद्यापीठाचे नाशिकचे छात्र शिक्षक शकीलखान हसनखान पठाण यांनी शिक्षणशास्त्र पदवीमधून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. ते वाडी ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणून पं. स. चिखली येथे कार्यरत आहेत.
शारीरिक कसरतीला परवानगी मिळाल्याने दिलासा
सुलतानपूर : काेराेना संसर्ग वाढत असल्याने शासनाने काही निर्बंध लावले आहेत. माॅर्निंग वाॅक व खुल्या मैदानात कसरती करणाऱ्यांना परवानगी देण्यात आल्याने ग्रामीण भागातील युवकांना दिलासा मिळाला आहे.