दिवठाणा (बुलडाणा) : पैनगंगा नदी व परिसरातील नदी नाल्यामधून मोठय़ा प्रमाणावर अवैध रेतीचा उपसा सुरू असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.दिवठाणा शिवारामध्ये रामनदी व पैनगंगा नदी यांच्या संगम आहे. या परिसरामध्ये पैनगंगा नदी पात्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर रेती आहे. या परिसरामध्ये अवैध रेतीमाफीयाची मोठय़ा प्रमाणात रेती उपसण्याचे काम चालु असून महसुल विभाग जाणीव पुरक दुर्लक्ष करीत आहे. हजारो ब्रास रेतीची चोरुन उपसा सुरु असताना एकाही रेती वाहतुक करणार्या वाहणावर कार्यवाही आजपर्यंत करण्यात आली नाही. दिवठाणा परिसरामधून रेती उपसा होत असताना महसुल विभागाचे कर्मचारी नदी पात्राच्या हद्दीचा व गावहद्दीचा बागुलबुवा करुन कार्यवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. सवणा, दिवठाणा, उत्रादा, बेलदरी पेठ शिवारामधून खुले आम रेतींची वाहतुक व उपसा होत असताना चिखलीच्या महसुल विभाग बघ्याची भुमिका घेत आहे. अवैध रेती वाहतुक करणार्याकडून अनेक शेतकर्यांना धमक्या देण्याचा प्रकारही सुरु आहे. अवैध रेती वाहतुक करणार्या वाहनानी शेतकर्यांचे मोठया प्रमाणात नुकसान सुध्दा करण्यात आले आहे. हजारो ब्रास रेतीची उचल होवून ही दंड मात्र एकाही वाहणावर करण्यात आला नाही. पैनगंगा नदीपात्रामध्ये मोठे मोठे खड्डे करण्यात आले आहेत. दरवर्षी मोठया प्रमाणात अवैध रेती उपसा झाल्यामुळे नदी पात्र अनेक ठिकाणी बदलेले आहे. काही ठिकाणी ७ ते ८ फुटापर्यंत नदी पात्र खोल करण्यात आले आहे. यामुळे नदी मात्र बदलण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. अवैध उपसा बंद न झाल्यास या परिसरातील शेतकरी महसुल विभागाच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.
दिवठाणा परिसरात अवैध रेती उत्खनन
By admin | Published: December 28, 2014 12:27 AM