गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली. एमएच-२८-व्ही २८८४ क्रमांकाच्या वाहनातून देशी मद्याचा साठा नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी रात्री या वाहनास थांबवून झडती घेतली असता त्यात अवैधरीत्या मद्याचा साठा सापडला. प्रकरणी चार चाकी वाहनासह मद्याचा साठा असा मिळून २ लाख ५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे १७ जुलै रोजीच देऊळगाव राजा परिसरात दुपारी ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रामेश्वर दत्ता पवार (३६) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
देऊळगाव राजात मद्याच्या अवैध साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:22 AM