शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

जिल्ह्यात अवैध रेतीची वाहतूक जोमात

By admin | Published: May 16, 2017 12:52 AM

बुलडाणा : जिल्ह्यात अवैध रेतीची वाहतूक जोमात सुरू असून, सोमवारी लोणार, सिंदखेडराजा, मलकापूर या तीन ठिकाणी अवैध रेती विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात अवैध रेतीची वाहतूक जोमात सुरू असून, सोमवारी लोणार, सिंदखेडराजा, मलकापूर या तीन ठिकाणी अवैध रेती विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. सिंदखेडराजा : तालुक्यातील खडकपूर्णा नदीतील रेती अवैधरीत्या वाहतूक करणारे दोन ट्रक तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने पकडले. ट्रकधारकांकडून एक लाख दहा हजार रुपयांचा दंड वसूल करून सदर ट्रक सोडून देण्यात आल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.अवैध रेती वाहतूक करीत असलेल्या वाहनाचा पाठलाग करून राहेरी येथील तलाठी आर.एस.देशमुख यांनी ट्रक क्रमांक एम.एच. १० इ.जी. १९२३ वाहन मालक निवृत्ती आसाराम काळे राहणार गंगापूर, ता.गंगापूर, जि. औरंगाबाद यांचे सदर ट्रक पकडले. सदर ट्रकमध्ये आठ ब्रास रेती अवैधरीत्या वाहतूक करीत असल्यामुळे ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तसेच वाहन क्रमांक एम.एच.२० बी.टी. २८४६ मालक शे अजहर शे.उमर ता.जि.जालना हे वाहन टी.पॉइंट सिंदखेडराजा येथे महसूल विभागाच्या पथकातील मंडळ अधिकारी बी.बी. वाघ यांनी पकडून तीस हजार दंड वसूल करण्यात आला. १३ व १४ मे रोजी शासकीय सुटी असल्यामुळे दोन्ही वाहनधारकांकडून जातमुचलका १०० रुपये बाँडवर नियमानुसार कार्यवाही करून १४ मे रोजी सकाळी ११ वाजता वाहन सोडून देण्यात आले. तहसीलदार संतोष कणसे यांचे महसूल पथकाने एप्रिल २०१७ पासून आजपर्यंत २४ प्रकरणात ४ लाख २० हजार १०० रुपये दंड वसूल केल्यामुळे रेतीमाफियांमध्ये घबराहट पसरली आहे. संग्रामपूर : रेती वाहतुकीचा परवाना नसलेले टिप्पर तहसील कार्यालयात लावण्यात आले. ही कारवाई १५ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेदरम्यान उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांनी केली. चांगेफळ फाट्याकडून भेंडवळ गावाकडे विना परवाना रेतीची वाहतूक करताना टिप्पर क्र.एमएच २८-एबी-३१७७ चा चालक साहेबराव पांडुरंग नेमाडे हा आढळून आला. दरम्यान, उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे हे चांगेफळ फाट्याकडून संग्रामपूरकडे दौऱ्यावर येत होते. ही बाब त्यांच्या लक्षात आली असता, त्यांनी टिप्पर थांबवून रेती वाहतुकीचा परवाना असल्याचे टिप्परचालकास विचारले; मात्र टिप्परचालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना नसल्याने हे टिप्पर संग्रामपूर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे. लोणार येथे दोन टिप्परची धडकलोणार : लोणार - सुलतानपूर मार्गावर सोमवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास दोन टिप्परची धडक झाली. सोमवारी दुपारी टाटा ४०७ क्रमांक एम.एच.२३ डब्ल्यू. ०६० व टाटा ४०७ एम.एच.१६. ए.ई. ३६५४ ही वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे तासभर वाहतूक खोळबंळली. याकडे मात्र लोणार महसूल विभागाचे अधिकारी अर्थपूर्ण कानाडोळा करीत आहेत. लोणार पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे राठोड यांनी वाहने हटवत तासभर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.