खामगाव: अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे दोन टिप्पर महसूल विभागाने पकडले. जिल्हाधिकार्यांनी केलेल्या कारवाईनंतर खळबळून जागे झालेल्या पथकाने त्वरीत कारवाई करीत दोन टिप्परवर कारवाई केली.
जिल्हाधिकारी खामगाव दौर्यावर असताना त्यांनी गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारी चार वाहने पकडली होती. ही वाहने ग्रामीण पोलीस स्टेशनला लावण्यात आली. दरम्यान, अवैध गौण खनिज वाहतुकीबद्दल जिल्हाधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने पारखेड फाट्याजवळ एमएच १९ सीवाय ४४८१ आणि एम एच २८ बीबी १६३८ हे दोन टिप्पर पकडले.
दोन्ही टिप्पर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. पारखेड शिवारासोबतच शेलोडी आणि गारडगाव शिवारातही मोठ्याप्रमाणात गौण खनिजाचे अवैध उत्खनन केले जात आहे.