अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): अवैध रेतीसह गौण खनिजाची वाहतूक करणारी चार वाहने जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री पकडली. ही वाहने कारवाईसाठी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली. त्यामुळे अवैध रेती माफीयामध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड बुधवारी खामगाव तालुका दौऱ्यावर होते.
दरम्यान, बुधवारी रात्री टेंभूर्णा आणि नांदुरा रोडवर गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी जिल्हाधिकार्यांनी स्वत:हून रेती आणि मुरूम वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी केली. चालकांकडे आवश्यक ते दस्तवेज आढळून न आल्यामुळे चारही वाहने कारवाईसाठी ग्रामीण पोलीस स्टेशनला लावण्यात आली. दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी वाहने पकडल्याचे समजताच महसूल विभागात एकच खळबळ उडाली. नायब तहसीलदार हेमंत पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खामगाव तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत जिल्हाधिकार्यांनी यावेळी प्रचंड नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
पॐोटो: