अखेर रस्त्याचे डांबरीकरण झाले सुरू
बुलडाणा : शहरातील इक्बाल नगर परिसरातील रस्त्यावर अनेक वर्षांपासून खड्डे पडले होते. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत होता. या भागातील रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात झाली आहे़ त्यामुळे, नागरिकांना दिलासा मिळणार आहे़
दाेघांचा मृत्यू
बुलडाणा : मलकापूर तालुक्यात काेराेनाचा कहर सुरूच असून शनिवारी दाेघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ कुलमखेड, मलकापूर येथील ७० वर्षीय पुरुष आणि माळी ता. मलकापूर येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे़
डिझेल भाववाढीचा शेतकऱ्यांना फटका
मेहकर : पाच राज्यातील निवडणुका संपल्याबराेबरच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत़ त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे़ डिझेलचे दर वाढल्याने शेती मशागतीसाठी यंत्राचे दरही वाढले आहेत़ त्यामुळे, शेतकरी संकटात सापडले आहेत़
लसीचा मुबलक साठा उपलब्ध करा
चिखली : तालुक्यातील एकलारा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण २२ गावे येतात. येथे ६ मे रोजी लस उपलब्ध झाल्याने नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठी गर्दी केली होती. लसीचे १०० डाेस उपलब्ध झाल्याने इतरांना परत जावे लागले़ त्यामुळे, लसीचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे़
लुटमार प्रकरणातील आराेपीस अटक
बुलडाणा : शहरातील लुटमार प्रकरणातील एका फरार आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. आनंद गणेश पवार रा.भिलवाडा जुनागाव बुलडाणा असे आरोपीचे नाव आहे. सत्यम दिलीप पसपूलकर व त्याच्या मित्रास चाेरट्यांनी लुटले हाेते़ या प्रकरणी पाेलिसांनी तपास करून आराेपीस अटक केली़