शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा एल्गार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:12 AM

सिंदखेडराजा: तालुक्यात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. तालुक्यातील गुंज येथील अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी एल्गार पुकारला असून, दारूची दुकाने बंद करून विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच नंदा तुपकर यांच्यासह शेकडो महिलांनी बुधवारला केली आहे.

ठळक मुद्देगुंज येथे दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांचा पुढाकरदारूची दुकाने बंद करून विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तालुक्यात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. तालुक्यातील गुंज येथील अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी एल्गार पुकारला असून, दारूची दुकाने बंद करून विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच नंदा तुपकर यांच्यासह शेकडो महिलांनी बुधवारला केली आहे.साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत गुंज येथे राणीबाई गवळी, रोहित पारधी, ज्ञानेश्‍वर वाकोडे आणि पांडुरंग विठोबा तुपकर हे चार इसम गावात अवैधरीत्या दारू विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना एका वाहनातून घरापर्यंंत दारूचे बॉक्स पुरविल्या जातात. ज्या वाहनातून ही दारू येते  ती नेमकी बनावट असून, आरोग्याला हानिकारक आहे. युवकांना दारूच्या आहारी जाण्यासाठी सदर विक्रेता त्यांना उधारीवर दारू पाजून व्यसनाधीन बनवित आहे. त्यामुळे युवकांची एक पिढीच बर्बाद होत असून, अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच शारीरिक, मानसिक छळ महिलांना निमूटपणे सहन करावा लागतो. या सर्व प्रकरणाची दाखल घेऊन गुंज येथील अवैध दारू विक्रीची दुकाने बंद करून विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच नंदा सुरेश तुपकर, पोलीस पाटील जगन्नाथ तुपकर, गणेश नरहरी तुपकर, अमोल सुरेश तुपकर, जयश्री तुपकर, चंद्रकला तुपकर, संगीता तुपकर, रुख्मिणा तुपकर, विद्या तुपकर, गोदावरी तुपकर, कमल तुपकर, वैशाली वाकोडे, शोभा वाकोडे, कुशिवर्ता शिंगणे, सुनीता अंभोरे, लता वाकोडे, गीता माघाडे, शारदा वाकोडे, कविता वाकोडे, निर्मला तुपकर, विमल ढवळे, गीता भालेराव, पानकोर गोफणे, वंदना अंभोरे, वच्छला अंभोरे, सरला तांगडे, सत्यभामा खंदारे, मंगला शिंगणे यासह १00 हून अधिक महिलांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठाणेदार सचिन शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

साखरखेडर्य़ातही सात ठिकाणी दारूची अवैध विक्रीसाखरखेर्डा गाव अवैध दारू विक्रीचे माहेरघर झाले असून, येथे मध्यप्रदेशमधून बनावट दारू एका वाहनातून सकाळी ३ ते ६ वाजताच्या वेळात येते. त्यावेळी प्रत्येक चौफुलीवर मेन रोडवर पोलिसांची गस्त असते. त्याचवेळी लव्हाळा, सवडद, मोहाडी, साखरखेर्डा, शिंदी, गुंज, वरोडी, पिंपळगाव सोनारा, गोरेगाव, काटेपांग्री, सायाळा, शेंदुर्जन, राजेगाव, कंडारी, भंडारी, जागदरी, दरेगावपर्यंंत दारू पोहचविल्या जाते. साखरखेडर्य़ात तर ठाणेदार शिंदे यांच्या नाकावर टिच्चून आठवडी बाजार, बसस्थानक परिसर, झोपडपट्टी, माळीपुरा यासह गल्लीबोळात दुकाने सुरू आहेत. एव्हढेच नव्हे तर मोबाइल सेवाही येथे पुरविल्या जातात. येणार्‍या-जाणार्‍या सुशिक्षित व्यक्ती, नोकरदार, महिला यांनी तर पोलीस प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करणे सुरू केले आहे. हा सर्व प्रकार दोन दिवसात बंद न झाल्यास साखरखेर्डा बंदची हाक द्यावी लागेल, असा इशारा शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांनी दिला आहे.