ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती प्रतिबॅग ६०० ते ७०० रुपयांनी वाढविल्या असल्याने कोरोनाच्या महामारीत अगोदरच हवालदिल बनलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप सध्याचे भाजप केंद्र सरकार चालवित असल्याचा आरोप करीत केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा राष्ट्रवादीने निषेध केला आहे. ही झालेली दरवाढ केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावी व गतवर्षाच्या किमतीतच खते उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने तालुका, जिल्हा व महाराष्ट्र स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
दरम्यान, कोरोनामुळे सर्वांचेच अर्थचक्र बिघडलेले असताना इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांनाही लुटण्याचा प्रकार होत असल्याने इंधन दरवाढ देखील तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी रा. काँ. प्रदेश प्रतिनिधी शंतनु बोंद्रे, विधानसभाध्यक्ष शंतनु पाटील, तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, रा. यु. कॉ. जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे, संतोष लोखंडे, निमराव देशमुख, प्रमोद पाटील, प्रमोद चिंचोले, सदानंद मोरगंजे, प्रशांत डोंगरदिवे, भगवान काळे, दीपक म्हस्के, राम खेडेकर, डॉ. प्रकाश शिंगणे, प्रशांत इकडे, बाळासाहेब पवार, डॉ. विकास मिसाळ, सतीश बाहेकर, प्रफुल्ल भुतेकर, प्रवीण घड्याळे, प्रशांत झिने, राजेश गवई, गणपतराव गायकवाड, रामेश्वर उबाळे, रहीम पठाण, विजय अंभोरे, अनिल कणखर, अनिल वाघ, दीपक काळे, नंदू अंभोरे, प्रवीण लहाने आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.