- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: लोणार सरोवरास ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पर्यावरण विषयक धोरणामध्ये लोणार विकासाला महत्त्व प्राप्त होणार असून लोणार सरोवर संवर्धन व संरक्षणाकरीता थेट राष्ट्रीयस्तरावरून धोरणात्मक निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गेल्या ११ नोव्हेंबर रोजी लोणार सरोवरार ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला. त्याचे प्रमाणपत्रही येत्या आठवड्यात मिळले. जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने ही एक मोठी उपलब्धी लोणार सरोवराच्या रुपाने जिल्ह्यास मिळाली असून यामुळे लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी व व्यवस्थापनासाठी तसेच स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्याकरीता राष्ट्रीय पातळीवरून तांत्रिक सहकार्य मिळण्यास मदत होणार आहे. यासोबतच जागतिक स्तरावरून सरोवर विकास व येथील पर्यावरण अधिक समृद्ध होण्यासाठी मदत मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. परिणाम स्वरुप लोणार सरोवरातील नैसर्गिक परिसंस्था, अधिवास व त्याच ठिकाणी आढळणारे विशिष्ट स्थानिक प्रजातीचे संवर्धन व त्यांचे संरक्षण करण्यासाठी मोठे पाठबळ या निमित्ताने मिळणार आहे, अशी माहिती अकोला विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) मनोजकुमार खैरनार यांनी दिली. त्यामुळे येथील विकासास प्राधान्य मिळेल.
लोणार सरोवराची हीपण आहेत वैशिष्ट?लोणार सरोवरासंदर्भात अनेक बाबी आपल्याला ज्ञात असल्या तरी सरोवर परिसरातील गोड्या पाण्याच्या जीवंत झऱ्यामुळे येथे जैवविविधता वृद्धींगत झाली आहे. या परिसरात पक्षांच्या १६० प्रजाती, ४६ सरपटणारे प्राणी आणि १२ प्रकारचे सस्तन प्राणी सरोवर परिसरात आढळतात. कोळ्यांच्या १२० प्रकारच्या प्रजाती येथे असून फुलपाखरांच्या ५५ ते ६० प्रजाती सरोवर परिसरात वैशिष्टयपूर्ण बनवतात. ३० प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती येथे आहेत. अमेरिकेतील स्मिथसोनियन संस्था, युनायटेड स्टेटस ऑफ जियोग्राफिकल सर्व्हे तसेच जिअेालॉजिकल सोसयटी ऑफ इंडिया व फिजिकर रिसर्च लॅबोरेटरी या सारख्या संस्थांनी लोणार सरोवरावर खूप संशोधन केले असून अभयारम्यातील जैवविविधतेवरही संशोधन होतेय.