नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी चिखली शहराच्या नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून शहराचा चेहरामोहरा बदलला असून रस्ते, वीज, शहराचे सुशोभिकरण याबाबत शहर विकासाला चालना मिळाली आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक ४ मधील शासकीय मागासवर्गीय हॉस्टेलपासून ते खामगाव रोडकडे जाणाऱ्या ९४ लाख रुपये किमतीच्या रस्त्याचे भूमिपजून नगराध्यक्षा प्रिया कुणाल बोंद्रे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी वैद्य होते. याप्रसंगी युवानेते कुणाल बोंद्रे, शेख अनिस, बांधकाम सभापती ममता बाहेती, महिला व बालकल्याण सभापती प्रभावती एकडे, नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, शैलेश बाहेती, प्रशांत एकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला माणिकलाल गाणात्रा, विश्वंभर शेळके, पंजाबराव देशमुख, कुंडलिकराव देशमुख, माणिक देशमुख, हरी येवले, वासुदेव महाले, गोपाल खत्री, अतुल गणात्रा, गणेश डाळीमकर, प्रा. डॉ. अनिल पुरोहित, प्रा. अभिजीत वडाळकर, संजय वसू, डॉ. शंतनू देशमुख, गजानन देशमुख, विनोद गिरी, समाधान काळे, राम शेळके आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
चिखलीकरांच्या ऋणातून उतराई होणे अशक्य : नगराध्यक्षा बोंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:39 AM