शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

चुका सुधारून पुढची पिढी घडविण्यासाठी कार्य करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 1:33 AM

चिखली : अस्वच्छता आणि घाणीमुळे रोगराई पसरते व त्यामुळे आपल्या देशात आजारी पडणारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. वर्षानुवर्षांपासून आपण करीत असलेल्या चुकांमुळे आपणच देशाचे एकप्रकारे आर्थिक नुकसान करीत आलो आहोत.

ठळक मुद्देस्वच्छता दूत भास्करराव पेरे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : अस्वच्छता आणि घाणीमुळे रोगराई पसरते व त्यामुळे आपल्या देशात आजारी पडणारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. वर्षानुवर्षांपासून आपण करीत असलेल्या चुकांमुळे आपणच देशाचे एकप्रकारे आर्थिक नुकसान करीत आलो आहोत. केवळ देशभक्तीपर गीते गाऊन देशभक्ती सिद्ध होत नाही, तर देशाला सुदृढ आणि निरोगी बनविणार्‍या स्वच्छ भारत अभियान यशस्वीपणे राबवून देशाला प्रगतिपथाकडे नेण्यासाठी कार्य करा, उघड्यावर शौचास बसणे, अस्वच्छ पाणी पिणे अशा चुका आपण करीत आलो; परंतु आता त्या टाळून भावी पिढी घडविण्यासाठी कार्य करा, असे आवाहन स्वच्छतादूत आदर्श ग्राम पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे यांनी केले.तालुक्यातील मंगरूळ (इ.) येथे स्वच्छता अभियानांतर्गत शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता आयोजित विशेष सभेत सरपंच पेरे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी आदर्श ग्राम पाटोदा येथे राबविलेल्या विविध योजना व अभियानाविषयी ग्रामस्थांना सखोल माहिती दिली. तसेच सन २00५ मध्ये त्यांच्या गावात स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधण्यास सुरुवात केली, तेव्हा गावातील सुमारे चारशे महिलांनी बँकेचे कर्ज काढून शौचालये बांधले. आता तुम्हाला शासन बारा हजार रुपये देत असतानाही तुम्ही शौचालय का बांधत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यासह आई-वडिलांची सेवा, पती-पत्नी यांनी एकमेकांना समजून घेणे, मुलांना चांगले शिक्षण देणे, सात्त्विक आहार, शरीरातील घाणीची योग्य विल्हेवाट लावणे ही पंचसूत्री अमलात आणून गावात स्वच्छतेची मोहीम यशस्वी करण्याबाबत सांगितले. प्रसंगी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, सरपंच देवानंद गवते यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प.स. सभापती संगीता पांढरे, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सुनंदा शिनगारे, कणखर, प.स. सदस्य उषा थुट्टे, द्वारका भोसले, उद्धव पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रामेश्‍वर रिंढे, सचिव आनंद पाटील, ग्रा.प. सदस्य कावेरी शिंदे, शारदा सुरूशे, मिलिंद बोर्डे, अंबादास गवते, शिवाजी शिंदे, प्रकाश शिंदे, गणेश सुरूशे, दिनकर लोखंडे, ग्रामसेवक शेळके, सिंधू बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेला ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.