शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त

By अनिल गवई | Published: September 09, 2022 11:27 AM

इच्छित मनोकामना पूर्ण करणाºया विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी खामगावात श्रध्देचा निरोप देण्यात आला.

खामगाव :

इच्छित मनोकामना पूर्ण करणाºया विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी खामगावात श्रध्देचा निरोप देण्यात आला. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत २८ श्री गणेश मंडळांनी सहभाग दिला. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला मानाचा लाकडी गणपती निघाल्यानंतर सकाळी ९ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. तत्पूर्वीच भाविकांनी घरगुती गणेश मंडळाचे भक्तीमय वातावरण विसर्जन केले. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने खामगाव शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.कोरोना विषाणू संक्रमणानंतर यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात श्रींचा उत्सव साजरा झाला.  ‘रिकामं झालं घर...रिता झाला मखर...पुढल्यावर्षी लवकर येण्यास निघाला आमचा लंबोदर’, ‘गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या’,अशा जयघोषात बाप्पांला आबालवृध्द भाविकांनी श्रध्देचा निरोप दिला.फरशी येथून गुरूवारी सकाळी ९ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला  प्रारंभ झाला. खामगाव येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत २८ गणेश मंडळं सहभागी झाले. सकाळी ९:५० वाजता खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी फरशी चौकात मानाच्या गणेशाचे पूजन केले. यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, भाजप शहराध्यक्ष शेखर पुरोहित यांच्यासह मान्यवरांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग दिला. मिरवणुकीच्या प्रारंभी खामगावचा राजा मानाचा लाकडी गणेश त्यानंतर तानाजी मंडळ तर तिसºयास्थानी हनुमान मंडळाचा गणपती आणि नंतर मिरवणुकीत सहभागी विविध गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी विविध गणेश मंडळाच्या आखाड्यांनी मल्लखांब तसेच रोप मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये हनुमान मंडळाच्या खेळाडूंनी सादर केलेल्या विविध प्रात्यक्षिकांना भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  दुपारी १ वाजता मानाचा लाकडी गणपती मस्तान चौकातून पुढे निघाला. या मिरवणुकीदरम्यान शहरात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

गणेश विजर्सनासाठी तगडा बंदोबस्तखामगावातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस उपायुक्त तथा तत्कालीन अपर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील, पोलीस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांना खामगावात पाचारण करण्यात आले आहे. तिन्ही अधिकारी खामगावात दाखल झाले असून गुरूवारी रात्रीच पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन