श्री गणेश गणपती स्थापनेचा मुहूर्त साधून ग्राहकांच्या सेवेत रुजू झालेल्या सप्तशृंगी महिला अर्बन को. ऑप. क्रे. सोसायटीमुळे हिवरा खुर्द नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याची प्रतिक्रिया याप्रसंगी जि.प. अध्यक्षा मनीषा पवार यांनी व्यक्त केली. आधुनिक युगाकडे वाटचाल करताना खेड्यातील नागरिकांची जीवशैलीसुद्धा बदलली पाहिजे. तरुणांनी व्यवसायाकडे, बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आदी बदलांचे स्वागत करणारी व गरिबांना पत निर्माण करून देणारी व्यवस्था हिवरा खुर्दवासीयांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्थापक अध्यक्ष देवानंद पवार, संस्थापक उपाध्यक्ष विष्णू वाकळे व संचालक मंडळाने सुसज्ज अशा सप्तशृंगी महिला अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून केला आहे. या सोहळ्याला गावातील व परिसरातील प्रतिष्ठित व्यापारी, शिक्षक, पत्रकार तसेच राजकीय, सामाजिक आदी सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती होती. यावेळी स्वामी हरिचैतन्यनंद महाराज यांचे स्वागत करून भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. कोरोनाचे नियम पाळून उद्घाटन सोहळा पार पडला.(वा.प्र.)
सप्तशृंगी महिला अर्बन शाखेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:40 AM