लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बळीराजा बदलत्या हवामान चक्रामुळे संकटात आहे. कधी जास्त पाऊस, तर कधी पाऊसच नाही, अशी परिस् िथती निर्माण झाली आहे. ऐन पीक बहरण्याच्या काळात पाऊस ये त नाही आणि पक्वतेच्या काळात जास्त पडतो. या परिस्थितीमुळे बळीराजा हवालदिल आहे. अशा संकटसमयी शेतकर्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी केले. बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद, मूग व सोयाबीन शेतमाल शासकीय हमीभावाने खरेदी केंद्र, शेतकरी भवन उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती जालींधर बुधवत, माजी आमदार धृपदराव सावळे, जिल्हा उ पनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, उपसभापती गौतम बेगामी, नगरसेवक जायभाये, सोनोने, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 1:34 AM