आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत उद्योजकांना दिलासा
बुलडाणा : गेल्या वर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या ‘आत्मनिर्भर’ पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील लघू उद्योजकांना १०५ कोटी ११ लाख रुपयांची संजीवनी मिळालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जवळपास २४५ सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
सहव्याधी असलेल्या रुग्णांकडे लक्ष
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहव्याधीमध्ये असलेल्या मधुमेह, हृदयरोग व तत्सम आजारांच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत सहव्याधी असलेल्या व्यक्तींवर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले होते. अशा व्यक्तींना गरजेनुरूप आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य देण्यात आले होते.
किसान पेन्शन योजनेत करदात्यांचा समावेश
बुलडाणा : पंतप्रधान किसान पेन्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांत सहा हजार रुपये देण्यात येतात. जवळपास ६ हजार ७११ करदात्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, यामध्ये गेल्या वर्षी काही करदात्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे.
पशुखाद्यांचे दर वाढल्याने शेतकरी त्रस्त
बुलडाणा : महागाईच्या काळात पशुखाद्यांचा दरही वाढला आहे. याचा परिणाम म्हणून दूध दरवाढ थांबली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दर वाढीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.