लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ग्राहकांच्या फसवणूकीचे प्रमाण दिवसेदिवस वाढत चालले आहे. गत वर्षभरात बुलडाणा जिल्हयात २३१ ग्राहकांनी तक्रारी दिल्याची नोंद जिल्हा ग्राहक मंचाकडे आहे. तक्रारीचे प्रमाण अधिक असले तरी निपटाºयाचे प्रमाण मात्र कमीच असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील तक्रारदार ग्राहकांनी जिल्हा तक्रार निवारण मंच, बुलडाणा कार्यालयात १ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ या काळात सुमारे २३१ तक्रार दाखल केल्या आहेत. या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. झटपट श्रीमंती मिळविण्यासाठी लहान तुकानदारांपासून ते मोठ्या व्यावसायिकांकडून सामान्य ग्राहकांची फसवणुक आणि लुबाडणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. बुलडाणा जिल्हात वर्षभरात २३१ ग्राहकांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे विविध प्रकारे व्यावसायिकांकडून आणि कंपन्यांकडून लुबाडणुक झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ग्राहकांची फसवणूक होत असल्याने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अतिस्वात आला आहे. त्यासाठी तक्रार निवारण मंचात मोफत न्याय देण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. जिल्ह्यातील तक्रारदार ग्राहकांनी जिल्हा तक्रार निवारण मंच, बुलडाणा कार्यालयात १ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ या काळात सुमारे २३१ तक्रार दाखल केल्या आहेत. या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. यामध्ये एमआरपी पेक्षा जास्त किंमतीत वस्तूंची विक्री करणे, वजनात दोष आढळले, बँकेकडून ग्राहक फसवणूकीची तक्रार, आयएसआय मार्क वस्तू भासवून निकृष्ट वस्तूंची विक्री होणे अशा अनेक तक्रारी ग्राहक मंचाकडे दाखल झाल्या आहेत. याचबरोबर ग्राहकांना मिळणाºया सुविधांपासून ग्राहकांना काही हरकती असल्यास ते ग्राहक मंचाकडे तक्रारी करू शकतात. न्यायमंचाकडे येणाºया तक्रारींचे प्रमाणही अलीकडेवाढले आहे. सदर तक्रारींचा निपटारा जिल्हा ग्राहक न्यायालयात केला जातो. देशभरात २४ डिसेंबर हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. आज बुधवारी यानिमित्त येथील बुलडाणा जिल्हा ग्राहक मंच कार्यालयातर्फे विविध कार्यक्रम राबविल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.मनुष्यबळाचा अभावग्राहक तक्रार निवारण मंचात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात नसल्याने ग्राहकांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अस्तित्वात आला. या कायद्याचे उल्लंघन करणान्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. यामध्ये खाजगी.सरकारी आणि सहकारी संस्थांचाही समावेश केला आहे. एखाद्या वस्तू किंवा सेवेबाबत ग्राहक समाधानी नसेल, तर तो त्याची तक्रार ग्राहक मंचाकडे नोंदवू शकतो.
ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी त्यांना मिळणाºया असुविधेची अथवा फसवणुकीची तक्रार जिल्हा ग्राहक मंचाकडे करावी. त्यांच्या तक्रारींची दखल घेवून संबंधितांवर योग्य ती कारवाई ग्राहक न्यायालयाच्या माध्यमातून केली जाईल.- आर.ए.पाटील, लेखाधिकारी, जिल्हा ग्राहक मंच