जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात त्यांनी १८ मे रोजी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या संदर्भात सर्वंकष आढावा घेताना उपरोक्त सूचना केल्या. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर मीना, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रशांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते प्रामुख्याने उपस्थित होते.
दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये संदिग्धांचे स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. ग्रामीण भागावरही त्यादृष्टीने लक्ष केंद्रीत केले जावे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती सुटता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. बाधितांना कोविड केअर सेंटरलाच भरती करून घ्यावे. प्राणवायूची कमतरता भासणार नाही, यादृष्टीने नियोजन केले जावे. सोबत प्राणवायूचे निर्माणाधिन प्रकल्प त्वरेने पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. सुपर स्प्रेडरच्या कोविड चाचण्या बंधनकारक कराव्यात. शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित कोरोना चाचण्या कराव्यात. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जावी.
--रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत करा--
जिल्ह्यात रेमेडेसिविर औषधांचा पुरवठा सुरळीत करावा. या इंजेक्शनच्या मागणीनुसार पुरवठा प्रत्यक्ष रुग्णालयांना करावा. काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी केली जावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत त्यांनी पॉझिटिव्हिटी रेट, मृत्यूदर, ऑक्सिजन बेडसह अन्य आरोग्य विषयक बाबींचा सविस्तर आढावा घेतला.