दुसरीकडे गायरान जमिनीही आता वहितीखाली आणल्या जात आहेत. त्याचाही परिणाम शेणखताची मागणी वाढण्यात आला आहे. दरम्यान, काही शेतकरी कसदार जमिनीचा पोत ढासळू नये, यासाठी शेणखतावर भर देताना दिसत आहेत. पूर्वी जमिनीत शेतकरी शेणखत टाकत असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात रासायनिक खताचा वापर होत असे; परंतु दिवसेंदिवस चाराटंचाईमुळे गुरांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने शेणखत मिळेनासे झाले आहे. रासायनिक खताचा वापर अमर्याद झाला असून शेती व्यवसायात तंत्रज्ञान आले आहे. अधिकाधिक पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरीवर्गाकडून रासायनिक खताचा अमाप वापरामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याऐवजी उलट जमिनीचा पोत खालावत आहे. त्यातच खरीप व रब्बी हंगामात सर्व पिकांना रासायनिक खताचा डोस दिल्याशिवाय अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, अशी धारणा वाढीला लागली आहे. पूर्वी शेतकऱ्याकडे जोडधंदा म्हणून गाई, म्हशी, बैल पूर्वी असत. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर अधिक केल्या जात होता. परंतु कालांतराने गुरांना चराईचे क्षेत्र कमी झाल्याने गुरांची संख्या घटली. शेतीला यंत्राच्या साह्याने शेतकऱ्याकडून शेती उपयोगी कामे केली जात असल्यामुळे अल्प शेतकऱ्यांकडे बैल पहावयास मिळतात.
सध्याचे दर...
एका ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी तीन हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामध्ये खत भरण्याची मजुरी वेगळी आहे. बैलगाडीसाठी ५०० रुपये आकारले जात आहेत. यापूर्वी शेणखत सहजतेने उपलब्ध होत होते. मात्र, आता त्याची उपलब्धता कमी झाल्याने त्यालाही भाव आला आहे.
--ज्वारीचा पेरा घडल्याने वैरणाची समस्या--
जिल्ह्यात अलीकडली काळात ज्वारीचा पेरा घटला आहे. त्यामुळे गुरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी पशुधनही जिल्ह्यात कमी होत आहे. त्याचा परिणाम शेणखत उपलब्धतेवर होत आहे.
--यांत्रिकीकरणात वाढ--
कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. जिल्ह्यातील १२७२ गावांमध्ये सरासरी २२ ट्रॅक्टर सध्या उपलब्ध आहेत. त्याद्वारेच शेतीची कामे केली जातात. त्यामुळे बैलांचाही वापर शेतात कमी झाला आहे. त्याचा फटकाही शेणखताचे दर वाढण्यात झाला असल्याचे चित्र आहे.