गावात पिण्याच्या पाण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने व पिण्याच्या पाण्यासाठी ५ लाख रुपये खर्च करून शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाणी फिल्टर प्लांट ग्रामपंचायत मार्फत उभा करण्यात आला आहे. त्या आरो पाणी फिल्टरमधून एक थेंंबही पाणी आजपर्यंत गावकऱ्यांना पिण्यासाठी मिळाले नाही. पाण्यासाठी वापरण्यात आलेला पैसा पाण्यात गेल्याचे चर्चा गावात सुरू आहे. अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे भोसा या गावात साथीच्या रोगाची लागण झाली असून, याकडे आरोग्य विभागासह स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देेण्याची गरज निर्माण झाली आहे.
भोसा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट न लावल्याने व अनेक नाल्या तुडुंब भरल्याने त्यामध्ये डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे. गावामध्ये अस्वच्छता असल्याने या साथीच्या रोगाची निर्मिती झाली आहे.
तरी भोसा गावातील नाल्या साफ करण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.