दरराेज २५०० ते ३००० नमुन्यांची चाचणी : तीन शिफ्टमध्ये सुरू आहे तपासणीचे काम
बुलडाणा : काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाभरात चाचण्या वाढविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर स्वॅब गाेळा करण्यात येत असल्याने बुलडाण्यातील स्वॅब तपासणी करणाऱ्या प्रयाेगशाळेवर माेठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. प्रयाेग शाळेत दरराेज २५०० ते ३००० अहवाल तयार करण्यात येत आहेत. तसेच तीन शिफ्टमध्ये काम सुरू आहे.
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहेत. त्यातच प्रशासनाने दुकानदारांचीही काेराेना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लाेकांचीही काेराेना तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे, स्वॅब तपासणी करणाऱ्या बुलडाण्यातील प्रयाेगशाळेवर माेठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. प्रयाेग शाळेची सर्वसामान्य स्थितीत १००० ते १५०० स्वॅब तपासणीची क्षमता आहे. तसेच आपत्कालीन परिस्थतीत सध्या प्रयाेगशाळेत २५०० ते ३००० नमुन्यांची तपासणी करून अहवाल देण्यात येत आहेत. स्वॅब घेण्यापासून ते प्रयाेगशाळेपर्यंत येण्यासाठी माेठी प्रक्रिया असल्याने चाचणींचे अहवाल येण्यास विलंब हाेत आहे. दुसरीकडे स्वॅब देणाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येत नसल्याने ताे पूर्ण गावात फिरताे. त्यानंतर दाेन ते तीन दिवसांनी ताे पाॅझिटिव्ह असल्याचे समाेर येत आहे. त्यामुळे काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे.
चाचण्याची संख्या एक लाखावर पाेहोचणार
प्रयाेगशाळेवर गत काही दिवसांपासून कामाचा ताण वाढला तरी एकही स्वॅब लगतच्या जिल्ह्यात पाठवलेला नाही. तसेच प्रयाेगशाळेत नियुक्त कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करीत आहेत. ९४ अहवालांचा एक रण पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार करण्यात येताे. बुलडाण्यात प्रयाेगशाळा सुरू झाल्यानंतर आतापयर्यंत चाचण्याची संख्या एक लाखापर्यंत गेली आहे.
रात्रीच पाेहोचतात स्वॅब
ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आराेग्य केंद्रस्तरावर स्वॅब घेतल्यानंतर ते संगणक परिचालकाकडे पाठवतात. त्याच्याकडून नाेंद घेतल्यानंतर ते पुढे प्रयाेगशाळेत पाठवतात. एका दिवशी सधारणत: १५० ते २०० च्या नाेंदी घेतल्या जात असल्याने स्वॅब प्रलंबित राहतात. दुसऱ्या दिवशी ते प्रयाेशाळेत येतात. त्यामुळे अहवाल येण्यास विलंब हाेत आहे.
प्रयाेगशाळेची क्षमता १००० ते १५००
सध्या सुरू असलेली तपासणी २५०० ते ३०००