बुलडाणा : जिल्ह्यात १५ जुलैच्या रात्री पावसाचे आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. दूसर्या दिवशीच पेरण्यांची लगबग वाढली व १0 टक्के पेरण्यापुर्ण होऊन हा आकडा १८ टक्यांपर्यत गेला, पाऊस नियमीत येईल असे वाटत असताना सलग दोन दिवस फक्त ढगाळ वातावरण राहिले अन् अनेक तालुक्यातून पावसाने दडी मारली त्याचा परिणाम आता पेरण्या खोंळबण्यावर झाला आहे.जिल्हह्यात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ १0.७७ टक्के पाऊस झाला आहे. पेरणीसाठी किमान १00 मीमी पावसाची गरज असते. या खेरीज पेरणी करणे योग्य नाही. मात्न किती दिवस पेरणी थांबवायची, या प्रतीक्षेत जवळपास ८२ टक्के क्षेत्नावर पेरणी झालेली नाही. जिल्ह्यात एकूण ७ लाख ४८ हजार ८00 हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असुन त्यापैकी १ लाख ३८ हजार ९१ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.*तुरळक पाऊस;११ तालुके कोरडे१६ जुलै रोजी जिल्हाभरात ३३.८0 मीमी पावसाची नोंद झाली असुन जळगाव जामोद, चिखली, सिंदखेडराजा, लोणार वगळता कुठेही पाऊस झालेला नाही तर आज १८ जुलै रोजी सकाळी ८ वाजे पर्यंंंत केवळ बुलडाण्यात ७ मीमी व जळगाव जामोद मध्ये २ मीम पावसाची नोंद झाली उर्वरीत १0 तालुके कोरडेच आहेत.
पेरण्यांचा टक्का वाढेना
By admin | Published: July 19, 2014 12:36 AM