ठळक मुद्देविषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.दोन लाख ९० हजार रुपये कर्ज
लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : तालुक्यातील कोल्हीगोलर येथील शेतकरी काट्यारसिंग रामचंद्र मोरे (वय ५५) याने सतत नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.त्यांच्याकडे ८ एकर शेती असून त्यांच्या वर बी डी सी बँक लिहा शाखेचे दीड लाख व स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा पोफळीचे एक लाख ४० हजार रुपये कर्ज आहे. त्यांच्यावर एकूण दोन लाख ९० हजार रुपये कर्ज आहे. गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते.