मेहकर : ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी दरम्यान तहसिलदार संतोष काकडे यांनी उद्धट वागणूक दिल्यामुळे त्यांचेवर कारवाईसाठी असोसिएशन आॅफ स्मॉल अॅण्ड मेडीअम न्युजपेपरर्स आॅफ इंडियाचे तालुका उपाध्यक्ष अशोक शेजुळ हे २३ आॅक्टोबर पासून स्थानिक तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. तर काही जणांनी साखळी उपोषण सुद्धा केले. नुकतीच मेहकर तालुक्यात ग्रा.पं.निवडणूक पार पडली. निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पत्रकारांना ओळखपत्र निवडणूक कार्यालयाकडून देण्यात येते. सदर ओळखपत्र मिळविण्यासाठी ८ आॅक्टोबर रोजी अशोक शेजुळ, रविंद्र वाघ, विजयराज सपकाळ, सै.हारुण सै.नुर, गजानन दुतोंडे, मुरलीधर गवई, विजय कान्हे आदी पत्रकार तथा संपादक तहसिलदार संतोष काकडे यांचेकडे गेले होते. मात्र संतोष काकडे यांनी ओळखपत्र न देता उद्धट वागणूक दिली, असे निवेदन संबंधितांना जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांचेकडे देऊन कारवाईची मागणी केली होती. परंतु सदर निवेदनावर कोणतीच कारवाई न झाल्याने २३ आॅक्टोबरपासून अशोक शेजुळ हे तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. तहसिलदार संतोष काकडे यांचेवर कारवाई करावी. तसेच दिवाळी सणाला अनेक गरीबांना रेशनचे अन्नधान्य मिळाले नाही. त्यांना अन्नधान्याचा वाटप करावा, यासाठी हे उपोषण सुरु करण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)
ग्रा.पं.निवडणुक मतमोजणी दरम्यान असा कोणताच प्रकार घडला नसून मी कोणालाही अपमानजनक वागणूक दिलेली नाही. तर अन्नपुरवठा कार्यालयातील कर्मचाºयांच्या संपामुळे अन्नधान्याचे वाटप होऊ शकले नाही. तरी लवकरात लवकर अन्नधान्याचे वाटप करण्यात येईल. - संतोष काकडे, तहसिलदार,मेहकर.