संघटन सचिवपदी वनिता गायकवाड
बुलडाणा : अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या संघटन सचिवपदी मलकापूर येथील वनिता गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांनी त्यांची नियुक्ती केली.
चिखलीत उन्हाचा प्रकोप वाढला
चिखली : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असतानाच, गत तीन-चार दिवसापासून प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करताना शहरवासीय दिसून येतात.
गॅस दरवाढ झाल्याने स्वयंपाक पुन्हा चुलीवर
बुलडाणा : गॅसच्या दरात माेठी वाढ हाेत असल्याने गृहिणी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र धामणगाव धाड परिसरात आहे. उज्ज्वला याेजनेंतर्गत अनेकांना माेफत गॅस मिळाला असला तरी दरवाढ झाल्याने गॅस परवडत नसल्याचे चित्र आहे.
ऑस्टाेमी रुग्णांना दिव्यांगाचा दर्जा द्या
बुलडाणा : ऑस्टाेमी रुग्णांना दिव्यांगांचा दर्जा देऊन त्यांना साेयी- सवलती देण्याची मागणी कमलापुरी वैश्य समाज महामंत्री राजेंद्रप्रसाद गुप्ता, ऑस्टाेमी असाेसिएशनचे सचिव शेखर ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
ग्रामीण भागात काेराेना रुग्ण वाढताहेत
सुलतानपूर : परिसरात गत काही दिवसापासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहेत़ आराेग्य विभागाने तातडीने उपाय याेजना करण्याची मागणी हाेत आहे़ तसेच ग्रामपंचायतींनी गावामध्ये फवारणी करण्याची गरज आहे़
बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
बुलडाणा : डाेणगावातील मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे, वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.
वर्षभरात तीन ग्रामसेवकांची बदली
बुलडाणा : चांगेफळ ग्रामपंचायतमध्ये वर्षभरात तीन ग्रामसेवकांची बदली झाली आहे. त्यामुळे, गावाच्या विकासाला खीळ बसली आहे. अंतर्गत राजकारणामुळे ग्रामसेवकांच्या बदल्या हाेत असल्याची गावात चर्चा आहे.
भादाेला परिसरात रानडुकरांचा हैदाेस
बुलडाणा : तालुक्यातील भादाेला शेत शिवारात रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. रानडुकरांचे कळप मुक्त संचार करत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.
कर्जमाफीची रक्कम देण्याची मागणी
बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम तत्काळ देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अग्रणी बँक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
ओलांडेश्वर संस्थान रस्त्याची दुरुस्ती करा
हिवरा आश्रम : येथील दुधा-ब्रम्हपुरी रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी एकनाथ सास्ते यांनी केली आहे. मंदिरात जाण्यासाठीचा रस्ता चढणीचा आहे. त्यामुळे भाविकांना येण्याजाण्यासाठी त्रास होतो. रस्त्याचे सपाटीकरण, रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोरोनाबाबत जनजागृती करा : कंकाळ
हिवरा आश्रम : कोरोना विषाणूने सर्वत्र खळबळ उडविली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांच्या मनातील संभ्रम व गैरसमज दूर करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने गावोगावी कोरोनाबाबत जनजागृती करावी, अशी मागणी राजू कंकाळ यांनी केली आहे.
गोहाेगाव परिसरात अवैध वृक्षतोड
गोहोगाव दांदडे : परिसरात बऱ्याच दिवसापासून वृक्षतोड जोमात सुरू आहे. मशीनच्या साहाय्याने वृक्षांची कटाई होत आहे. झाडांची दररोज पांगरखेड ते डोणगाव या मार्गावरून वाहतूक होत आहे. आंबा, निंब, बाभूळ या झाडांची अवैध वाहतूक होताना दिसत आहे. वनविभागाकडून कारवाई होत नसल्याने वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे.