- अनिल उंबरकारलोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : जलसंधारणाच्या माध्यमातून घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ३० एकर जमिनीवर पाच कोटी लिटर पाणी जिरविण्याचा उपक्रम शेगाव पालिकेने हाती घेतला आहे.त्यानुषंगाने या प्रकल्पासाठीच्या ३० एकर जमीनीवर चर खोदण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.खडकाळ व पडीक जमिनीवर चर खोदून पावसाचे पाणी अडवले जाते. जलसंधारण विभागाकडून ही कामे दरवर्षी होतात. शेगाव नगर पालिकेची घन कचरा प्रक्रिया केंद्राची अतिरिक्त जवळपास ३० एकर जमिन शहरापासून अवघ्या तिन किमी अंतरावर आहे. तेथे हे काम हाती घेण्यात आले आहे. यातून खर्चाचीही बचत पालिका करणार आहे.माजी मंत्री तथा विद्यमान आ. डाॅ. संजय कुटे यांच्या ‘स्वच्छ, सुंदर व हिरवेगार शेगाव’ या संकल्पनेतंर्गत पाणी अडवा, पाणी जिरवा, जागोजागी वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे काम नगर पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठीनगराध्यक्षा शकुंतला बुच, उपाध्यक्षा सुषमा शेगोकार, शरद अग्रवाल, मुख्याधिकारी डाॅ. प्रशांत शेळके यांनी उपक्रम सुरू केला आहे.
नगर पालिकेच्या घन कचराप्रक्रिया केंद्राच्या अतिरिक्त जागेवर कमी खर्चात ५ कोटी लिटर्स पाण्याचे जलसंधारण होत आहे.- संजय मोकासरे, अभियंता नगर परिषद, शेगांव